|
स्त्री. १ अंतर्दाह , वेदना ( पित्तानें , तिखटानें ); आग ; ( क्रि० सुटणें ). मिर्ची चावतांच उपाय नाहींसा तोंडाला जळजळाट सुटला . २ जुलूम ; जबरदस्ती . ३ क्रोधयुक्त मत्सर ; मनांत जळणें ; पोटांत राग . ( क्रि० सुटणें ). ४ प्रेमाची , मायेची आंच , अतिशय प्रीति , कळकळ . जळजळणें - अक्रि . १ घशांत किंवा पोटांत दाह होणें . ( ऊन्ह , तिखट अन्नापासून किंवा पित्तापासून ) ( अकर्तृक प्रयोग ) जसें - पोटांत - उरांत - घशांत - जळजळतें . २ ( क्व . ) ( वर शब्दाबरोबर प्रयोग ) तडफडणें ; रागानें जळणें ; जळफळणें . ३ तापानें काहिली होणें . [ जळजळ ] जळजळाट - पु . १ ( जळजळचा अतिशय ) कडक आग ; उष्णता ; पोळणें ; भाजणें ; दाह ; अतिशय जळजळ ( गळा , डोके , पोट , घसा या ठिकाणीं ). २ रागाचें कृत्य ; उपद्रव ; भयंकर जुलूम ; अत्याचार . ( क्रि० करणें ; मांडणें ; चालविणें ; बसविणें ). मामलेदाराचा जळजळाट भारी हो ! म्हणून तीं कुळें परागंदा झालीं . ३ निष्ठुरपणा ; अतिशय कडकपणा . ४ दरारा ; धाक . पूर्वीं त्याबरोबर वाद सांगावा , तर त्याचा जळजळाट होता त्यामुळें उपाय नव्हता . जळजळीत - वि . १ अतिशय उष्ण ; कढत ; उकळणारें ( पाणी , वस्तु ). २ तिखट ; तीक्ष्ण ; कडक ( मसाला , मद्य ). ३ ( व्यापक ) झक्क ; स्वच्छ ; लखलखीत ( रुपया , द्रव्य ). ह्या सणंगाला मीं जळजळीत दहा रुपये दिले . - क्रिवि . पूर्णपणें ; पूर्ण ; पुष्कळ प्रमाणानें ; भरपूर ; घळघळीत .
|