|
स्त्री. एक धान्य ; जोंधळा ; ज्वारी [ सं . यव + नाल - जोनाल ; हिं . जुआर , ज्वार ; का . जोळ ] नस्त्री . १ मोठया शहरा शेजारचीं खेडीं . २ लहान पेठ ( कापडाची ); नागपूर , नारायणपेठ , इ० कापडाच्या मोठया पेठा आहेत त्याजवळचा लहान लहान पेठा . प्रत्येकी . हा धोतरजोडा पेठेचा आहे कीं जवारी आहे ? [ अर . जुवार = शेजार ] न. १ ( गो . ) जवाहिर पहा . २ जवाहिर्याचा धंदा . जवार केले तरी फिटेना । - दा १९ . ७ . २० . [ अर . जौहर , अव . जवाहिर ] ०चा जवारी - वि . गावरानी ; खेडयांत उत्पन्न , तयार झालेलें . ( तूप , वस्त्र , इ० ).
|