Dictionaries | References ज जशी शक्ति, तशी भक्ति Script: Devanagari Meaning Related Words जशी शक्ति, तशी भक्ति मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्यामानानें देव पराक्रमी असेल त्या मानाने त्याचे भक्त त्याच्याशी वागतात. ज्या देवांची लोकांना अधिक भीति वाटते, त्यांना तृप्त करण्याची ते अधिक धडपड करतात व ज्यांच्यापासून त्यांना पीडा होण्याची भीति नसते त्यांस ते फारसे विचारीत नाहीत. आपण व्यवहारांत पाहातो की, म्हसोबा, काली, सटवाई, शीतळाई, वगैरे ज्या देवतांची लोकांना फार भीति वाटते व ज्यांपासून रोग वगैरे होतील अशी धास्ती वाटते त्यांस अडाणी लोक बकरे, कोंबडी वगैरे वरचेवर देऊन संतुष्ट राखण्याची काळजी घेत असतातपण इतर देवांचे त्या मानाने नामस्मरणहि करीत नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP