|
अ.क्रि. १ गमन करणें ; चालू लागणें ; प्रवास करणें ; पुढें सरणें ; पूर्वस्थळ सोडणें . तो या गांवातून पळून गेला . २ पूर्वस्थळ सोडून विवक्षित स्थळ गांठणें . तो उद्यां पुण्यास जाणार आहे . २ निघून जाणें ; नाहींसे होणें , नाश पावणें ; हरवणें ; हलविलेलें असणें . या कोनाडयांतली वस्तु कधीं जात नाहीं पण आज गेली . ३ लोटणें ; क्रमणें ( वेळ ). हां हां म्हणतां वर्ष गेलें . ४ छिद्रादिकांत प्रवेश करणें ; आंत शिरणें ; समाविष्ट करणें . या दौतीचे भोकांत लेखणी जात नाहीं . ५ ( विशेषत : भूतकालांत उपयोग ) वायां जाणें ; नासणें ; निरुपयोगी , टाकाऊ होणें . खराबणें ; अयथायोग्य होणें . ही बायको चांगली पण कंबरेंत गेली . हा कसला विद्वान पण अभिमानानें गेला . ६ घडून येणें , होणें ( नजरचूक , गुन्हा , योग्य किंवा रूढ मार्गाचें उल्लंघन ) हा आंगरखा बरा उतरला पण गुंडीजवळ कांहीं गेलें रोज औषध घेत असें त्यांत एक दिवस माझे हातून गेलें , रोगानें बळ केलें . ७ एखाद्यापासून चुकून होणें , घडून येणें ( गफलतीनें एखादी चुकीची गोष्ट ). ती गोष्ट मजपासून गेली खरी . ८ वजा होणें ; शक्ति जाणें ; गुण जाणें ( इंद्रिय , औषध यांचा ) १० अनुसरणें ; पाठीमागून जाणें ; वेधणें ; अभिलषित होणें ( मन , डोळे , कान , प्रीति इ० ) ( वर अथवा कडे शब्दाबरोबर प्रयोग ). चांगली बायको करूं नये तिजवर लोकांची इच्छा जाते . ११ दिलें जाणें ( शब्द , वचन - भूतकाळीं उपयोग ) १२ र्हास , नाश होणें ; झिजणें ( शरीर ). १४ एखाद्या स्त्रीशीं रत होणें ; संभोग करणें . १५ कांहीं एक पदार्थानें विवक्षित कालपर्यंत टिकणें . याला धोतरजोडा सहा महिनेपर्यंतसुध्दां जात नाहीं . कोणत्याहि क्रियापदाच्या वर्तमानकालवाचक विशेषणाबरोबर ह्या क्रियापदाचा उपयोग केला असतां त्याचा अर्थ क्रियासातत्य दर्शविण्याकडे होतो . उदा० जसा व्यापार वाढवाल तसा मी पैसा देत जाईन . २ सकर्मक क्रियापदाच्या पूर्णभूतकाळाबरोबर उपयोग केला असतां कर्मकर्तरीचा अर्थ होतो . जसें - तुला शिक्षा केली जाईल . ३ ऊनप्रत्ययांत धातुसाधिताशीं उपयोग केला असतां याचा अर्थ क्रियापूर्णता दर्शविण्याकडे होतो . जसें - तळयांतील पाणी आटून गेलें . शरीर वाळून गेलें . ४ दुसर्या क्रियापदाच्या आज्ञार्थी रूपानंतर ह्या क्रियापदाच्या आज्ञार्थाचा उपयोग केला असतां पहिल्या क्रियापदावर जोर दिला जाऊन , क्रियेचा जोरदारपणा सिध्द होतो . जसें - आण जा ; ठेव जा ; दे जा . कर जा इ० [ सं . या ; प्रा . जा ; फ्रेंजि . जा ; रशियन या . ] ( वाप्र . ) जाजा येये - स्त्री . निरर्थक पुन : पुन : जाणें येणें ; खेपा . माझ्यानें हें हजारदां जाजा येये करवत नाहीं . [ जाणें - येणें ] जायाचा , जायां , जायांस - प्रसंगविशेषीं उसना घेतलेला ; आपल्या हातांतून पुढें - मागें जाणारा ; दुसर्याचा ( कपडा , रत्नें वस्तु ). म्ह० जायाचें लेणें लाजिरवाणें . गेलामेला , गेलामेला गतला - सर्वस्वी गेला ; अजीबात , कायमचा नाहींसा झाला . ( माझें , तुझें , त्याचें इ० ) - काय जातें - गेलें ? - मला , त्याला , तुला , त्याची काय परवा , किंमत ? गेला तो मेला - गेलेलें पुन्हां भरून येत नाहीं गेलेला असणें - पाहाण्यांत , अनुभवांत , आढळण्यांत , ऐकण्यांत येणें , असणें . हें मला गेलेलें आहे . = हें मला ठाऊक आहे . न. १ जन्म ; जगणें . जिणें पहा . काय जीणें मारिलें दुष्ट भाजे । - चिंतामणि , ध्रुवाक्यान . १४ ( नवनीत पृ . ४१२ ). [ सं . जीव ]
|