|
न. १ यज्ञोपवीत ( उपनयनचिन्ह - सूत्र ) २ ( कुंभारी ) मडकें चाकावर बनत असतां त्याच्या मध्यभागीं वाटोळी चिकटवून ठेवतात ती सुंभाची दोरी . - बदलापूर ६६ . ३ लसण्या नांवाच्या रत्नावर एखादे वेळीं दिसणारी पांढरी रेघ . ४ ( बे . ) नांगराचा फाळ व पान जोडणारा लोखंडी वाटोळा तुकडा . ५ ( बे . ) गांडूळ [ सं . यज्ञोपवीत ; प्रा . जण्णोवीअ . हिं . पं . जनेऊ ] ( वाप्र . ) ०तोडावयास , जानव्यास हात घालणें - अतिशय रागावणें ; चिडणें ; जानवें तोडण्याचा धाक घालणें . ( जानवें तोडलें असतां धर्म जाऊन अपवित्रपणा येतो ). उठणें , जानव्यास हात घालणें - अतिशय रागावणें ; चिडणें ; जानवें तोडण्याचा धाक घालणें . ( जानवें तोडलें असतां धर्म जाऊन अपवित्रपणा येतो ). ०मोकळें , उक्तें - सुतकांतून मोकळें होणें ; क्रियाकर्म करून शुध्द होणें ; दुसरें शुध्द जानवें घालणें . करणें , उक्तें - सुतकांतून मोकळें होणें ; क्रियाकर्म करून शुध्द होणें ; दुसरें शुध्द जानवें घालणें . ०सोडविणें उतरणें - जानव्याच्या जागीं तरवारीचा वार करणें जानवा पहा . ०धोतर , धोतर टाकणेंब - १ अतिशय रागावणें ; डोक्यांत राख घालणें . २ निर्लज्ज , बदफैली होणें ; बेफाम उधळणें . जानव्याची लाज धरणें , जानव्यास लाजणें - ( जानवें पवित्र म्हणून त्याचा मान राखणें ). जानवें ( धर्म ) सांभाळण्यासाठीं तरी दुराचरण न करणें . जानव्याधोतराची गांठ घालणें - १ अतिशय रागावणें ; रागानें बेफाम होणें . २ ( तुझ्या , त्याच्या या शब्दांशीं जोडून ) दुसर्याच्या ( जानव्याच्या ) नाशाची धमकी देणें . जानव्याला जानवें मिळणें - सजातीयांचें ऐक्य होणें , मिलाफ होणें , एक होणें ; जात ओळखणें . जानव्यास वस्त्रा बांधणें - ( पूर्वी वादविवादांत जिंकल्यास जयपत्र घेणें किंवा आपण पराजित झाल्यास वस्त्र्यानें जानवें तोडणें असा क्रम असे ) यावरून जिंकण्याची प्रतिज्ञा करणें . फाडणें , धोतर टाकणेंब - १ अतिशय रागावणें ; डोक्यांत राख घालणें . २ निर्लज्ज , बदफैली होणें ; बेफाम उधळणें . जानव्याची लाज धरणें , जानव्यास लाजणें - ( जानवें पवित्र म्हणून त्याचा मान राखणें ). जानवें ( धर्म ) सांभाळण्यासाठीं तरी दुराचरण न करणें . जानव्याधोतराची गांठ घालणें - १ अतिशय रागावणें ; रागानें बेफाम होणें . २ ( तुझ्या , त्याच्या या शब्दांशीं जोडून ) दुसर्याच्या ( जानव्याच्या ) नाशाची धमकी देणें . जानव्याला जानवें मिळणें - सजातीयांचें ऐक्य होणें , मिलाफ होणें , एक होणें ; जात ओळखणें . जानव्यास वस्त्रा बांधणें - ( पूर्वी वादविवादांत जिंकल्यास जयपत्र घेणें किंवा आपण पराजित झाल्यास वस्त्र्यानें जानवें तोडणें असा क्रम असे ) यावरून जिंकण्याची प्रतिज्ञा करणें . ०जोड पु. पांच जानवीं . जानव्याचा धनी - वि . जानवें धारण करणारा वर्ग ( ब्राह्मण , क्षत्रिय आणि वैश्य वर्ग ).
|