|
पु. एक धान्याचें रोप व त्याचा दाणा ; ज्वारी ( धान्य ) किंवा त्याचें ताट . याच्या जाती :- उतावळी , निवळा , शाळू , रातडी , पिवळा जोंधळा , खुंडी , काळवोंडी , दूधमोगरा , याशिवाय केळी , अरगडी , डुकरी , वेंदरी , गडगूप इ० हलक्या जाती आहेत . जोंधळयाच्या भाजून लाह्या करतात व कुजवून दारू काढतात . पिठाची भाकरी होते . [ सं . यावनाल ; प्रा . जोष्णलिआ ; का . जुनळ ; तेलगु . जोन्न ; हिं . जोन्हरी ] जोंधळी पोत - स्त्री . जोंधळयासारखे बारीक सोन्याचे मणी असलेली व ४।५ पदरांची , मधोमध जाळीचा मणी किंवा बेलपान असलेली पोत . जोंधळे उचलणें - शपथ घेणें . ( शपथेचा एक प्रकार ).
|