Dictionaries | References

झळमणें

   
Script: Devanagari
See also:  झळंबणें , झळंवणें

झळमणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To hang heavily upon; to cluster thickly around--fruits. 3 To quiver in water--sunbeams &c.: to quiver or undulate--heated vapor in the air, the मृगतृष्णा. 4 To be affected with a blast from a पिशाच.

झळमणें     

उ.क्रि.  १ ( जातांना एखाद्या पदार्थाशीं ) घासणें ; चाटून जाणें ; घसवटणें ; खरडणें . २ भूत , पिशाच्च यानीं पछाडणें ; झपाटणें . ३ ( काव्य . ) ( दु : ख , गर्व , माया , मोह इ० कांनीं ) पछाडणें ; व्याप्त होणें ; झोंबणें . सवेंचि प्राणी झळंवला । मायाजाळें । - दा ३ . ४ . ४९ . ४ ताप देणें ; जाळणें ; पोळणें . प्राक्तनुचंडांसाचा रश्मी । थोर तातली कर्मभूमि । झाउवी षदुउर्मी । झळंबिला जो । - ऋ ९ . ५ उन्हांत तापविणें ; ऊन देणें . ६ स्पर्श करणें ; स्पर्शणें ; ( ल . ) लेपणें . कापूरकुमुदांचें पाणी । मर्दिजे चंद्रकिरणी । तेणें ते विरहिणी । झळंबीजे । - शिशु ७७५ . [ झळ ] - अक्रि . २ भरून येणें ; उचंबळणें ; डबडबणें ; बुडणें . तैसे डोळे दीसति झंळवैले । अश्रुपतीं । - ऋ १६ . २ हेलकावे , गटंगळया खाणें . जन्ममृत्यूचिया लाटीं । झळंबती इया सृष्टी । - ज्ञा १२ . ८७ . ३ विरघळणें . जैसें लवण जळें झळंबलें । - ज्ञा २ . ३ . ४ आदळणें ; धक्के दिले जाणें ; हादरणें ; डगमगणें ; मर्मी लागणें . पै पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंबती सत्यलोकींचे हुडे । - ज्ञा ७ . ८४ . ५ ओळंबणें ; लोंबणें ; लटकत राहणें . त्या नदीच्या तीरावरून एक मोठें झाड झळंबलें आहे . - सिंब ४५ . ६ ( गुच्छाच्या रूपान फळें , फुलें झाडावर ) लोंबत राहणें . [ तुल० का . झल्ली = झुपका ] ७ ( सूर्यकिरणांनीं पाण्यांत किंवा मृगजळानें हवेंत ) हेलकावे खाणें ; हेलकावणें . ८ ( भूत , पिशाच्च इ० कानीं ) पछाडलें - झपाटलें जाणें ; चिकटणें . ९ झळ लागणें . [ झळ ] झळंबून धरणें - ( फळें इ०कांनीं झाडापासून ) लोंबत राहणें ; लटकून राहणें ; झळंबणें अर्थ ६ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP