|
न. १ वृक्ष ; झुडुप ; रोप ; वनस्पति ( लहान , मोठी ). तूं फिरलास झाडोझाड मीं फिरलों पानोपान . = तुझ्या पेक्षांहि मला जास्त माहिती आहे . २ शाखायुक्त वस्तु , पदार्थ ; वृक्षाकार वस्तु . ३ मेणबत्ती इ० लावण्याचें कांचेचें झुंबर ; पुष्कळशा उदबत्त्या लावण्याचें वृक्षाच्या वाकाराचें धातूचें घर . चांदीच्या झाडांतून उदबत्त्या खोंविल्या होत्या . - अस्तंभा १३६ . ४ दारूकामांतील एक प्रकार ; वृक्षाच्या आकाराचें दारूकाम . ५ भूतानें पछाडलेलें माणूस . ज्यास भूत पछाडतें त्या झाडास तें सुग्रास अन्न खाऊं देत नाहीं . - अस्तंभा ५८ . ६ वंशवृक्ष ; वंशावळ . ७ ( कु . ) बंदुकीचा लांकडी भाग , दस्ता . [ स . झाट ; प्रा . झाड ] ( वाप्र . ) ०उभें उत्कृष्ट रीतीनें एखादें काम वठविणें . उदा० गायन , वादन , कीर्तन , व्याख्यान इ० इतक्या उत्तम शैलीनें करणें , रंगविणें कीं जणुं काय तें करणारा , एक विशाल व फळाफुलांनीं युक्त असा वृक्षच उभारीत आहे असें वाटावें . कोण्या झाडाचा पाला - एखाद्याचा दिमाख , नक्षा मगरूरी उतरण्याकरितां , उध्दटपणाची लुडबुड थांबविण्याकरितां , अभिमान , अधिकार झिटकारण्याकरितां योजावयाचा शब्द ; अशा माणसाविषयीं क्षुद्रता व तिरस्कार दाखविणारा शब्दसमूह . सुभेदार ? हं ; सुभेदार म्हणजे कोण्या झाडाचा पाला ? आम्ही ओळखीत नाहीं असें जाऊन सांग जा ? - नाटयकथार्णव . झाडाचे राऊत दिसणें , झाडाचे राऊत - भीति इ० कामुळें झाड घोडेस्वार इ० कांच्या आकृतीप्रमाणें दिसणें ; दोरीचा साप बनविणें ( बायबलांत सुध्दां अशीच कल्पना जजेस ९ . ३६ . मध्यें दृष्टीस पडते ). झाडावरचें भूत - ( ल . ) ज्याचा नामनिर्देश करणें अनिष्ट आहे अशा नीच , तिरस्करणीय मनुष्याबद्दल वापरावयाचा वाक्प्रचार . सुक्या झाडास वाक लावणें , सुक्या झाडास वांक लावणें - ( सुकलेलें झाड इष्ट त्या दिशेनें वांकवितां येणें शक्य नाहीं यावरून ल . ) एखाद्या वृध्दास उपदेश करणें , हट्टी , हटवादी , पूर्वग्रहदूषित माणसास बोध करणें ( पालथ्या घागरीवरच्या पाण्याप्रमाणें आहे ). सामाशब्द . झाडकी - स्त्री . किर्र झाडी . करणें उत्कृष्ट रीतीनें एखादें काम वठविणें . उदा० गायन , वादन , कीर्तन , व्याख्यान इ० इतक्या उत्तम शैलीनें करणें , रंगविणें कीं जणुं काय तें करणारा , एक विशाल व फळाफुलांनीं युक्त असा वृक्षच उभारीत आहे असें वाटावें . कोण्या झाडाचा पाला - एखाद्याचा दिमाख , नक्षा मगरूरी उतरण्याकरितां , उध्दटपणाची लुडबुड थांबविण्याकरितां , अभिमान , अधिकार झिटकारण्याकरितां योजावयाचा शब्द ; अशा माणसाविषयीं क्षुद्रता व तिरस्कार दाखविणारा शब्दसमूह . सुभेदार ? हं ; सुभेदार म्हणजे कोण्या झाडाचा पाला ? आम्ही ओळखीत नाहीं असें जाऊन सांग जा ? - नाटयकथार्णव . झाडाचे राऊत दिसणें , झाडाचे राऊत - भीति इ० कामुळें झाड घोडेस्वार इ० कांच्या आकृतीप्रमाणें दिसणें ; दोरीचा साप बनविणें ( बायबलांत सुध्दां अशीच कल्पना जजेस ९ . ३६ . मध्यें दृष्टीस पडते ). झाडावरचें भूत - ( ल . ) ज्याचा नामनिर्देश करणें अनिष्ट आहे अशा नीच , तिरस्करणीय मनुष्याबद्दल वापरावयाचा वाक्प्रचार . सुक्या झाडास वाक लावणें , सुक्या झाडास वांक लावणें - ( सुकलेलें झाड इष्ट त्या दिशेनें वांकवितां येणें शक्य नाहीं यावरून ल . ) एखाद्या वृध्दास उपदेश करणें , हट्टी , हटवादी , पूर्वग्रहदूषित माणसास बोध करणें ( पालथ्या घागरीवरच्या पाण्याप्रमाणें आहे ). सामाशब्द . झाडकी - स्त्री . किर्र झाडी . ०कुट न. ( गो . ) वाळलेलें , मोडून पडायला आलेलें झाड , फांदी , काटकी . ०खंड न. १ जंगल ; झाडी ; झांकर ; जुंबाड ; राई ; रान . विशाळें बहू लागलीं झाडखंडें । - राक १ . १२ . २ झुडुपें ; जाळी ; लहान झाडांचा समुदाय . [ झाड + खंड ] ०खंडा विक्रिवि . १ ( वर दिलेल्या झाड उभें करणें ह्या वाक्प्रचाराच्या उलट अर्थी - झाडाचीं पानें , फुलें , फळें , तोडून टाकलीं असतां तें बेढब व ओबडधोबड दिसतें यावरून ) ओबडधोबड ; अर्धवट ; रुक्ष ; नीरस ; अशास्त्रीय ; अव्यवस्थित ; बेशिस्त असें ( गायन , वादन , कीर्तन , व्याख्यान इ० ). २ गुरूपाशीं अभ्यास न करतां नुसतें ऐकून आपल्याच अकलेनें वाजविणारा व त्याचें तें वादन ; स्वयंसिध्द ( गवयी , वादन ). त्याचा बाणा , वाणी , गाणें , वाजविणें , म्हणणें , झाडखंडा आहे . [ झाड + खंडणें ] ०खंडा स्त्री. ( क्व . ) झाडें व झुडपें . दरें दर्कुटें झाडखंडी अनेकी । - दावि . - वि . अरण्यमय ; जंगलाचा ( प्रदेश ; जागा इ० ). [ झाड + खंड ] ०गळ वि. वृक्षमय . झाडाखंडी पहा . ०झडुल्ला पु. ( व्यापक ) लहानमोठया झाडांचा समुदाय ; वृक्ष ; झुडुपें ; रोपटीं . [ झाड द्वि . ] ०झाडोरा झुडपी झडुल्ला झूड झुडुप - पुस्त्री . न . लहानमोठया झाडांचा समुदाय . ( समुच्चायर्थी , एकूणएक किंवा कोणतेहि ० . झाडझडुल्ला पहा . ०दस्त पु. फळझाडांवरील कर . झाडदस्त झाडे सुमारी ३१ येकूण रुपये . - मसाप २ . २ . १४३ . [ म . झाड ; फा . दस्त = कर ] ०पंचाळ वि. १ ( माकड अतिशय चपळ असल्यानें तें जणुं काय एकाच वेळीं पांच झाडांवर असल्याचा भास होतो यावरून ) चपळ ; तरतरीत ; टुणटुणीत ; चलाख . २ चंचल ; चळवळया ; चुळबुळया ; पायांवर भोंवरा असलेलें ( मूल इ० ). ०पदरी वि. किनारीमध्यें रेशमाचीं झाडें , फुलें काढलेलें ( वस्त्र इ० ). [ झाड + पदर ] ०पाला पु. १ ( व्यापक ) ( औषधाच्या उपयोगी ) वनस्पती , त्याचा पाला , मुळें इ० ( सामा . ) वृक्ष ; वनस्पति . २ ( व्यापक अर्थी ) खाण्याच्या उपयोगाचा भाजीपाला , पानें इ ००पाल्याचें न. वनस्पतीपासून तयार केलेलें औषध ; याच्या उलट रसायनी औषध - खनिज धातु - पदार्थ इ० कांपासून केलेलें . [ झाड + पाला ] औषध न. वनस्पतीपासून तयार केलेलें औषध ; याच्या उलट रसायनी औषध - खनिज धातु - पदार्थ इ० कांपासून केलेलें . [ झाड + पाला ] ०पेढ पेड पेमाड - पु . ( व्यापक ) झाडझाडोरा पहा . [ हिं . झाड + पेड = झाड ; माड ] ०झाडरूं न. लहान झाड ; झुडूप . या वाजूस रानांतून , डोंगरावर दवणा , रामाठा , ... वगैरे झाडरूंच रगड . - खेया ४३ . [ झाड ] झाडशाई - स्त्री . वस्त्रांवर काढलेलीं झाडाझुडपांचीं चित्रें . - वि . झाडांचीं चित्रें ज्यावर आहेत असें ( वस्त्र , भिंत , जमीन ). झाडझवा - वि . ( शब्दश : अश्लील , पण तो अर्थ मनांत येत नसल्यानें रूढ ) उनाड ; भटक्या ; भणंग ; भटकभैरव ; उडाणटप्पू . [ झाड + झवणें ] झाडळ , झाडळी - स्त्री . दाट झाडी ; राई . जीवधर्माचिया झाडळी । मनोरथाचिया वंशजाळी । - ज्ञाप्र २६६ . झाडसुनें - न . झाडकुत्रा ; कुत्र्याची एक जात . पाणसुनीं झाडसुनीं । नाना प्रकारींचीं सुनीं । - दावि २४४ . [ झाड + सं . शुन = कुत्रा ]
|