Dictionaries | References

टोणग्‍याचे कानीं वाजविली किन्नरी

   
Script: Devanagari
See also:  टोणग्‍याचे कानीं वाजविली किंगरी

टोणग्‍याचे कानीं वाजविली किन्नरी     

रेड्याला पुष्‍कळ सुंदर गायन ऐकविले तरी ते कळण्याचे ज्ञान त्‍याला नसल्‍यामुळे ते त्‍याला मुळीच आवडत नाही. उलट त्‍याचा अथवा त्‍याच्या सहचार्‍यांचा आवाज कर्णकटु असला तरी त्‍याला तो प्रियच असतो. ज्‍या गोष्‍टींत आपणांस गम्‍य नाही ती उत्तम असली तरी तिची काही किंमत नसते
उलट आपणाला आवडणारी किंवा चिरपरिचित वस्‍तु इतरांच्या दृष्‍टीने वाईट असली तरी आपणांस बरी वाटते. तु०-गांवढ्यापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP