Dictionaries | References

डाव

   
Script: Devanagari

डाव     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जातूंत हार वा जैत आसता वा डाव लायिल्लो आसता असो सुरवाते सावन शेवटा मेरेन खंयचोय खेळ   Ex. शामान हारतां हारतां निमण्या वेळार डाव जिखलो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पाळी
Wordnet:
asmবাজি
bdबादायनाय
benবাজি
gujબાજી
hinबाज़ी
kanಬಾಜಿ
kasبٲزۍ
malപന്തയം
mniꯄꯥꯟꯖꯤꯜ
oriବାଜି
panਬਾਜ਼ੀ
tamபந்தயம்
telపందెం
urdبازی
See : दाव, चाल

डाव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
At the least; at the lowest or worst. डाव लागू होणें in con. & वर of s. To lose the game. डावी पेटणें g. of o. To be inflamed or incensed against.

डाव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A game. The time or turn to cast or play. The time of prevalence or power; one's opportunity. Spite, grudge, malice.
  धर. A bowl of wood &c. गेला डाव (तरी) At the least.
डाव लागू होणें.   in con. & वर of s. To lose the game.

डाव     

ना.  कपट , कारस्थान , कावा , गुप्तहेतू , डावपेच , युक्ती ;
ना.  खेळ , सामना ;
ना.  अनुकूल संधी . योग्य वेळ . प्रसंग ( डाव साधून वार केला ).

डाव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत   Ex. त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले./भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली
HYPONYMY:
डंकी धोबीपछाड
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पेच
Wordnet:
bdफिदिंनाय
benপ্যাঁচ
gujદાવ
kanತಿರುವು
kasداو , چال
malഅടവ്
oriପେଚ
panਦਾਅ
sanयुक्तिः
telపిడిగుద్దు
urdداؤ , چال , گھات , داؤپیچ
noun  बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया   Ex. तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही
SYNONYM:
बाजी
noun  फासे, कवड्या यांची फेकणी   Ex. हा सहाचा डाव पडला.
See : वैर, पळा, पळी, डावपेच, पाळी, सामना, हात

डाव     

 पु. लोखंड तापवून केलेले चिन्ह ; डाग . [ डाग ]
 पु. बसण्याची जागा ; अड्डा ; कट्टा ; खेलण्याची वगैरे जागा . ' यास्तव माशाचे डाव जागजागा राजश्री स्वामीनी घातले आहेत . नित्य जाऊन गल टाकून बसावे .' - पेद ८ . २६ . ( ठाव ?)
 स्त्री. कटवा ; डव ; पळी ( लाकडाची ). [ डव ] म्ह ० १ डाव असता हात भरुं ( भाजू ) नये . २ पात्रात असला तर डावेत येईल .
 पु. १ खेळ ( बुद्धिबळे , सोंगट्या , चेंडू इ० चा ). २ ( कवड्या , फांसे इ० ) टाकणे ; फेकणे ; फेंक . ( क्रि० टाकणे ). ३ ( फाशांचे ) पडणे ; दान . ( क्रि० पडणे ). ४ खेळण्याची वेळ , पाळी . ५ हार ; पराभव . हा डाव तुम्हावर लागला . ९ खेळातील हात ; पाने ६ ( राजा ) खेळण्याचा पट ( कापड , लाकूड , फळा , जमीन इ० वर काढलेला ). तुझी कवडी डावाबाहेर गेली . ७ ( व . ) जाड , वजनदार कवडी . ८ योग्य वेळ ; प्रसंग ; हंगाम ; अनुकूल काळ . ९ अंमल ; चलती ; अधिकाराची वेळ , दिवस ; एखाद्याची पाळी ; संधि . ८ अधिकार ; ताबा ; आटोका . १० द्वेष ; मत्सर ; वैर ; डंख . जैसा महासर्पे धरिला डाव । त्याचेच फणेवर पडिला पाव । ११ डावपेंच ; युक्ती ; बेत ; गुप्त हेतु ; कपट . ( क्रि० खेळणे ). त्याने डाव टाकून मला चांगलेच फसवले . १२ ( व . ) वेळ . एक डाव आपण तेथे जाऊच . [ फा . दाव ] ( वाप्र . )
 पु. ( को . ) एक प्रकारचे जहाज , गलबत . इंग्रजीत अरबी जहाजाला डौ ( धौ ) शब्द लावतात . [ इं . डौ ]
०देवाचा   ( खेळात ) देवाला पहिले दान देणे . हुकलेला डाव देवाचा म्हणून पुन्हा खेळतात . लगेच तो म्हणाला हा डाव देवाचा . सुनंदाला हे आवडले नाही . - सुदे ६ .
०देणे   क्रि . पाळी देणे .
०पडणे   ( प्रा . ) १ प्राप्त होणे ; घडणे . २ फांशाने खेळणे . मिया नक्षत्री डाव पाडावा । चंद्र चेंडुवालागी देयावा । - ज्ञा ११ . ५८१ .
०फेडणे   अंगावर आलेली बाजू फेडणे .
०बसविणे   ( सोंगट्या ) रंगसही झालेल्या चारी सोंगट्या आपल्या पटावरील घरांच्या तीन रांगांपैकी मधल्या रांगेत विशिष्ट रीतीने बसविणे .
०लागणे   अंगावर बाजू येणे ; हरणे .
०साधणे   जिंकणे ; द्वेषबुद्धीने दुसर्‍याचे नुकसान करणे ; कपटाने संधि साधून शत्रूस मारणे . डावी पेटणे एखाद्यावर अतिशय रागावणे ; जळफळणे . गेला डाव ( तरी ) निदान ; कमीतकमी . म्ह ० फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याव .

डाव     

डाव देणें
पाळी देणें
हार येणें. खेळामध्ये स्‍वतःवर दुसर्‍याचा डाव देण्याची वेळ येणें.
डाव असतां हात भरूं (भाजूं) नये
[डाव=चमचा, पळी] पदार्थ ऊन असला व जवळ पळी असेल तर तो पदार्थ हाताने न काढता पळीने काढणें योग्‍य होय. हाताने काढल्‍यास हात भाजण्याचा संभव असतो. जेथे इतर साधनांनी एखादी गोष्‍ट साध्य होत असेल तेथे ती स्‍वतः करण्याच्या भरीस पडूं नये. तीत धोका येण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP