Dictionaries | References

तस्लमात

   
Script: Devanagari
See also:  तस्लीम , तस्लीमात

तस्लमात     

 स्त्री. १ वंदन ; रामराम ; सलाम . २ देणगी ; बक्षीस ; इनाम . समस्त लहानथोरी तस्लीमात बज्या आणिली . - ऐटि १६५ . हैदरखान यास पञ्च हजारीची तस्लीमात जाली . - रा १ . १७९ . ३ मोघम खर्ची ; खर्चाकरिता अमानत दिलेली रक्कम . ती जागा तानाजी येवला याचे तस्लीमातीस दिली आहे . - रा १२ . १८३ . ४ ताबा ; कबजा ; दिम्मत . ज्याचे तस्लीमात जे हत्यार असेल त्याची चौकशी राखीत जावी . - भोंकु ४० . ५ उपयोग ; उपभोग . तसलमात पहा . [ अर . तस्लीम = याचे अव . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP