|
उ.क्रि. - ( मूल , पशू इ० कांस ) पायाला दोरी बांधून जखडणे ;
- ( मनुष्य , पशु इ०कांस ) खांबाशी आवळून बांधणे ; मुस्क्या बांधणे ; शृंखलाबद्ध करणे .
- ( ल . ) ( एखाद्यास ) एखाद्या ठिकाणी काही कामावर गुंतवून , परतंत्र करुन , खिळून , आवळून टाकणे ; डांबणे .
- ( एखाद्यास त्रास , उशीर होईल अशा रीतीने ) अडकविणे ; खोळंबा करणे ; खोळंबून धरणे ; ताटकळत , टांगून ठेवणे .
- ( एखाद्यास अनेकांनी अनेक दिशांस ) ओढणे ; ताणणे ; खेंचणे ; ( एखाद्याची ) ताणाताण , खेंचाखेंच , कुतरओढ करणे , दोन्ही घरच्या पाहुण्यांस दोन्हीकडे तांगडतात .
- ( जनावर , वाहन , पदार्थ इ० कांस ) बेदरकारपणे , धसफशीने , धसमुसळेपणाने वागविणे , वापरणे , उपयोगात आणणे , अतिशय खपावयास लावणे ; ( घोड्यास ) भरमसाटपणे दामटणे .
- सांधासांध करुन , ठिगळ देऊन ( जुन्या टोपल्या , वस्त्रे , चटया इ० ) नीट - दुरुस्त करणे .
- ( राजा . ) एखाद्याने आरंभिलेले काम त्याच्या हातून सिद्धीस न जाईसे झाले असता दुसर्याने यथाकथंचित साधून घेणे . - अक्रि . खपणे ; रखडणे ; काबाडकष्ट , कुत्तेघाशी करणे , हा गडी उन्हांत , थंडीत , पावसांत , चिखलांत तांगडतो . [ तं ( तां . ) गडी ]
|