Dictionaries | References

तांब्‍याशिवाय चांदी नाद धरीत नाहीं

   
Script: Devanagari

तांब्‍याशिवाय चांदी नाद धरीत नाहीं     

चांदीला नाद असला तर तीत तांबे आहे असे समजावे. नुसत्‍या चांदीला तितका नाद नसतो, तीत तांबे मिसळले असतां तिचा नाद अधिक कर्ण मधुर लागतो. यावरून थोडासा हीन अंशहि चांगल्‍या गोष्‍टीस पुष्‍कळदां शोभदायक अगर अधिक फलदायक होतो. उदाहरणार्थ, सुंदर गौर मुखावर काजळाचे गालबोट किंवा तीट त्‍याची शोभा वाढविते. चंद्राला कलंक त्‍याची शोभा वाढवितो याप्रमाणें. -गांगा २५५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP