|
वि. ( ठाकरी .) एक वर्षाच्या आंतील बैलास म्हणतात . वि. १ आईच्या अंगावर असलेला ; स्तनपान करणारा ( वत्स , मूल , वासरुं , पारडूं ). बाळ , बालक . जे तान्हेनि मियां अपत्ये । आणि माझे गुरु एकलैते । - ज्ञा १५ . १९ . म्हणे माता तान्हया काय झाले . । चिंतामणी - ध्रुवाख्यान ( नवनीत पृ . ४११ . ) २ जिचे वासरुं , पारडे अंगावर पित अशी ( गाय , म्हैस इ० जनावरांतील मादी ); ३ नुकतीच व्यालेली ( या अर्थी हा शब्द साधारणपणे जनावराच्या मादीच्या संबंधानेच वापरतात ). ४ ( सामा . ) लहान ; बाल . [ सं . तनु = लहान ? सं . स्तन्य ] तान्ही ओलवल - स्त्री . पावसाळ्यांतील पहिल्या पावसाने जमीनीला , शेताला येणारी मामुली , तात्पुरती , थोडीशी ओल . तान्हुला - वि . लहान ; तान्हे ( मूल इ० ). येकटे मही मम तान्हुले । - नव १२ . ९० . तान्हे पारठे - पुअव . आईच्या अंगावर पिणारे मूल व पारठी , म्हणजे त्याच्याहून मोठी असलेली मुले समुच्चायाने ; ( सामा . ) चिलीपिली ; लहान मुले इ० [ तान्हा + पारठा ]
|