Dictionaries | References

तुंबडी

   
Script: Devanagari

तुंबडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To stick closely and perseveringly unto.

तुंबडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The bowl of mendicants. A cupping instrument.
तुंबडी भरणें   Get one's fill of riches, food &c.
तुंबडी लावणें   Stick closely and perseveringly to.

तुंबडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शरीरातील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी वापरतात ते नळीसारखे यंत्र   Ex. त्याच्या गळवाला तुंबडी लावावी लागेल.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benশিং এর নলী
kokशिरींग
malകൊമ്പിൽ നിർമ്മിച്ച കുഴൽ
oriଶିଙ୍ଗନଳୀ
panਸਿੰਗੀ
telఎముక
urdسینگی
See : तुंबा

तुंबडी     

 स्त्री. १ शरीरांतील दूषित रक्त किंवा वायु काढावयाचे नळीसारखे यंत्र ; रक्तशोषक यंत्र . ( क्रि० लागणे ; लावणे ). विष शोषिले संपूर्ण । दुग्धही गेले सरोन । सर्वांगीच्या शिरा ओढून । तुंबडी एकचि लागली । - ह ४ . १८४ . २ गोसावी , बैरागी इ० चे लांकडी किंवा भोपळयाचे भिक्षापात्र . बाजीरावनाना । तुंबडीभर देना । ३ भोपळा असलेले एक तंतुवाद्य . [ तुंबी ]
 स्त्री. तंगी ; टंचाई ; - शर .
०भरणे   १ पुष्कळ जेवणे ; आपल्या पदरांत पाहिजे तितके पाडून घेणे . २ अयोग्यप्रकारे पुष्कळ पैसा खाणे . मुक्या जनावराच्या तोंडातले काढून तू आपली तुंबडी भरली , त्याचे पातक कोठेरे फेडशील ? - रंगराव .
०लावणे   १ पिच्छा पुरविणे . २ वित्त , शक्ति इ० चे शोषण करणे . म्ह ० रिकामा न्हावी कुडाला तुंबड्या लावी . सामाशब्द -
०बाबा  पु. गोसावी ( तुंबडी वापरणारा ). तो तुंबडीबाबा घालीतसे फेरी । नृत्य करी त्यापुढे ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP