|
पु. १ ( लांकूड इ० ) तोडण्याची क्रिया ; ( फुले , फळे इ० ) खुडण्याची , तोडण्याची , गोळा करण्याची क्रिया . ) क्रि० करणे ; काढणे ; घेणे ; उतरणे ; तोडणे ). २ ( लांकूड इ० कांचा ) तोडलेला भाग ; तुकडा ; ठोकळा ; ओंडा . सुतळीचा तोडा ३ ( बे . ) मिरच्या , कापूस इ० काढण्याचा , तोडण्याचा हंगाम . [ तोडणे ] ०मिरच्या , कापूस इ० काढण्याचा , तोडण्याचा हंगाम . [ तोडणे ] पु. १ सोन्याची , चांदीची - मोहरा , रुपये इ० हजार नाणी भरलेली पिशवी . - वाडमा १६४ . श्रावणमासी खर्चतो कोट्यावधि तोडा । - राला २ . १०१ . २ बंदुकीतील दारु पेटविण्याचा काकडा ; जामगी . पहार्यास शिपाई उभे पेटवुनी तोडा तोडा । - राला १०१ . ३ दोराचा , दोरीचा , सुतळीचा हात दोन हात लांब तुकडा . ४ कठिण व जाड जरतार . ५ ( दारुकाम ) फुलबाज्या , बाण इ० बांधण्याच्या उपयोगाचा चिखलांत भिजविलेला सुताचा दोरा , वाख . [ तोडणे ] तोड्याची बंदूक - स्त्री . तोड्याने , काकड्याने दारु पेटवून उडवावयाची बंदूक . इच्या उलट चापेची बंदूक . पु. १ ( सोनारी धंदा ) हातांत , पायांत घालावयाचा सोन्याचा , चांदीचा एक प्रकारचा दागिना . २ शिंदेशाही घडणीचीच पण क्वचित पोकळ बनावाची ( स्त्रियांच्या ) हातांतील सोन्याची जाड साखळी . ३ ( को . ) दरवाज्याच्या मुख्य चौकटीच्या वरच्या चौकटीची वगैरे तोड्यासारखी नक्षी . ४ ( पगडबंद ) सांखळीच्य कड्यांच्याप्रमाणे केलेले पागोट्यांतील बांधणीचे काम . ५ लुगड्याच्या कांठांतील कड्यांच्या सांखळीच्या आकाराची विशिष्ट रचना ( इं . ) डिझाईन . पु. ( वाद्य ) सतार वगैरे वाद्यांच्या गतीस शोभणारा स्वरसमूह ; तबल्याचा , नृत्याचा एक विशिष्ट बोल . ०उठविणे ( चांदीच्या हत्यारांचा धंदा ) नग तयार झाल्यावर त्यावर झिलई करणे ; तकाकी देणे . शिंदेशाही तोडा पु . एक बोट जाडीच्या चांदीच्या , वर्तुळाकार कड्या करुन एका कडीची निमुळती टोके दुसर्या दोन कड्यांतून गोविली जातील अशा रीतीने त्या कड्या एकमेकांत अडकवून पायाच्या मापाचा हा दागिना करतात . क्वचित कड्यांना तोंडाशी मोगरे केलेले असतात किंवा मळसूत्र असते . ०साखळी स्त्री. ( बैलगाडीचा धंदा ) बैलाच्या गळ्यांत घालावयाची पितळेची सांखळी . ०काढणे आवणाच्या मुरगळलेल्या काड्या बेणणीबरोबर उपटणे . - बदलापूर २९४ . ०टाकणे ( गवंडीकाम ) विहीरीच्या बांधकामांत , घराच्या भितींत - ती बांधीत असतांना - कोनाडा इ० करिता रिकामी जागा सोडणे . तोडातोडा डी स्त्री . १ सर्रास , सर्वसाधारण किंवा जोराची खापलण्याची , तोडण्याची , छाटण्याची , कापण्याची क्रिया ; छाटाछाट ; कापाकाप . २ ( ल . ) ( एकमेकांतील व जोराची ) सतावून सोडण्याची , छळण्याची , त्रास देण्याची क्रिया . ३ ( आईपासून मुलास , नवर्यापासून बायकोस कठोरपणाने ) तोडणे ; दूर ठेवणे ; ताटातूट , वियोग करणे . ४ कठोरपणे ताटातूट , वियोग झालेली स्थिति . [ तोडणे द्वि . ] तोडामोडा पु . १ ( मिळकती , दुकाने , धंदा , दागदागिने , सामानसुमान इ० ) मोडणे ; विकणे ; विल्हेवाट लावणे ; पैसे करणे . २ ( एखाद्या संघटित योजनेच्या , विधानाच्या , कारखान्याच्या अंगोपांगांची ) वाताहत , फाटाफूट करुन ते बंद , बरखास्त करणे . ( क्रि० करणे ). ३ ( एखादी इमारत , जिन्नस , धंदा इ० ) मोडकळीस येणे , आणणे ; मोडकळीस येऊ न देणे ; विस्कळीत होऊं देणे ; मोडतोड करणे ; नाश करणे . ४ विस्कळित , पांगापांग झालेली , उध्वस्त , नासधूस झालेली स्थिति . ( क्रि० करणे ; होणे ). [ तोडणे + मोडणे ]
|