|
पु. १ काठी ; सोटा ; छडी ; सोडगा ; दंडा . २ मार ; शिक्षा ( शारीरिक ). ३ शिक्षा म्हणून घेतलेला पैसा ; याचे राजदंड , ब्रह्मदंड्द जातिदंड असे तीन प्रकार आहेत . सरकारी न्यायपद्धतीने गुन्हा शाबीत झाला म्हणजे शिक्षेदाखल सरकारांत भरावयाचा पैसा . ४ खांद्यापासून कोंपरापर्यंतचा हात . ५ केलेल्या , पाडलेल्या भागांच्या खुणांकरितां शेतांत किंवा बागांत घातलेला मातीचा उंचवटा ; बांध ; गडगा ; पाणी जाण्यासाठी दोहो बाजूंस उंचवटा करुन पाडलेली सरी , पाट ; ( बे . ) नदीकिनारा ; कांठ ; ( वस्त्राचे ) दोन तुकडे जोडण्याकरितां घातलेली शिवण . ( क्रि० घालणे ). [ प्रा . दंडी = जुन्या वस्त्राचा सांधा ] ६ लांबी मोजण्याचे परिमाण , चार हातांची काठी . २००० दंड म्हणजे एक कोस . ७ वेळेचे परिमाण , चोवीस मिनिटे . ८ पैलवानांच्या व्यायामाचा एक प्रकार ; जोर . आनंत्या नित्यनेम उठतो दंड सवाशे काढितो । - ऐपो ६७ . ( यावरुन ) एखादे कठिण काम अथवा प्रचंड उद्योग . ( क्रि० काढणे ; पेलणे ). ९ क्रमाने उतार असलेली किंवा निमुळती पण लांबट टेंकडी , सोंड ( पर्वताची ). १० डोंगराच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत असलेला उतार , ओघळ , अरुंद वाट ; दंडवाट . ११ पर्वताच्या रांगेची एक लहान शाखा ; डोंगराच्या माथ्यापासून तो पायथ्यापर्यंत वांकडीतिकडी गेलेली खडकांची ओळ . १२ ( कवाईत वगैरे प्रसंगी केलेला ) सैन्याच्या रचनेचा एक प्रकार ; रांग ; फरा ; व्यूह . तया दंडी क्षोभले । लोकत्रय । - ज्ञा १ . १६५ . १३ ताठ उभे राहण्याची अवस्था . १४ जिंकणे , ताब्यांत , कह्यांत आणणे . १५ अपराधाबद्दल शिक्षा म्हणून घेतलेले द्रव्य , पैसा ; जातींत परत घेण्यासाठी दिलेले प्रायश्चित्त . १६ रताळी , ऊस इ० लावूण्याकरिता मातीचा केलेला लांबट उंचवटा , वरंबा . १७ तडाका . निंदा निस्तेज दंडी । कामलोभावर पडी । - ज्ञा १३ . ४९४ . १८ हिंसा . ऐसा मने देहे वाचा । सर्व संन्यासु दंडाचा । - ज्ञा १३ . ३१० . १९ पाठीचा कणा . माजी उभारलेनि दंडे । शिरकमल होय गाढे । - ज्ञा ६२०२ . [ सं . ] ( वाप्र . ) वि. हट्टी ; उद्धट ; हेकट ; झोंड ; जबरदस्त . वि. हट्टी ; उद्धट ; हेकट ; झोंड ; जबरदस्त . ०आवळणे बांधणे दंडाला काढण्या लावणे - चतुर्भुज करणे ; कैद करणे . ०थोपटणे १ कुस्ती खेळण्यापूर्वी दंड ठोकणे ; कुस्तीस सिद्ध होणे . २ ( ल . ) साहसाने अथवा कोणासहि न जुमानता एखादे कार्य करण्यास उभे राहणे . ०थोपटून राहणे - ( ल . ) वाग्युद्धास तयार होणे . उभे राहणे - ( ल . ) वाग्युद्धास तयार होणे . ०दरदरुन फुगणे - आपल्याशी कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानांचे दंड स्फुरण पावून फुगणे . घाम फुगणे - आपल्याशी कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानांचे दंड स्फुरण पावून फुगणे . ०फुरफुरणे मारामारीची , कुस्तीची वगैरे उत्कट इच्छा होऊन दंड स्फुरण पावणे . ०भरणे शिक्षेदाखल पैसा देणे . दंडास दंड लावून घासून क्रिवि . बरोबरीच्या नात्याने ; सारख्या सन्मानाने . दंडाला माती लावणे कुस्तीला तयार होणे ( कुस्तीपूर्वी दंडास माती लावतात ). दंडापासून साधित शब्द - दंडादंडी स्त्री . मारामारी ; काठ्यांची झोडपाझोडपी ; कुस्ती ; झोंबी . [ दंड ] दंडायमान वि . १ ( अखंडित काठीप्रमाणे ) निर्मर्याद ; अपार ( वेळ , काळ ). २ मध्ये पडलेला ; आडवा पडलेला , पसरलेला . [ सं . ] दंडारणा पु . सोटा ; सोडगा ; बडगा . - वि . जाड ; स्थूल ; घन ( वस्तु ); बळकट ; मजबूत ; जाड ( मनुष्य , पशु ). दंडारा ळा वि . ( शिवण ) ज्यास दंड घातला आहे असे ; मध्ये शिवण असणारे ( वस्त्र , कपडा ). [ दंड ] दंडावणे अक्रि . थंडीने अथवा अवघड श्रमाने ताठणे ( शरीर , अवयव ). [ दंड ] दंडासन न . आळसाने ( जमीनीवर ) पाय ताणून पसरणे , निजणे ; सरळ हातपाय पसरुन आळसाने पडणे . ( क्रि० घालणे ). [ सं . दंड + आसन ] दंडार्ह वि . दंड्य ; दंड करण्यास योग्य . [ सं . ] दंडित वि . १ शिक्षा केलेला ; दंड केलेला . २ ( ल . ) निग्रह केलेला ; वश केलेला ; मारलेला ; ताब्यांत आणलेला . [ सं . ] दंडिता वि . शिक्षा करणारा ; मारणारा ; शिक्षा करतो तो . [ सं . ] दंडिया पु . १ बारा ते पंधरा हात लांबीचे धोतर , लुगडे . २ बाजाराचा बंदोबस्त करणारा छोटा अधिकारी ; पोलीस मुकादम . [ हिं . ] दंडी पु . १ दंड धारण करणारा ; संन्याशी . २ द्वारपाल . ३ - स्त्री . अर्ध्या दंडापर्यंत बाह्या असणारी चोळी . [ सं . ] - वि . १ दंड धारण करणारा . २ दंड म्हणजे उभी जाड शिवण असलेला ( कपडा ). दंडी स्त्री . मेण्यासारखे , चार माणसांनी उचलावयाचे टोपलीचे वाहन . डोंगर चढतांना हीत मनुष्य बसतो व हमाल ही खांद्यावर वाहतात . [ हिं . ] दंडुका पुस्त्री . ( काव्य ) हाताचा पुढचा भाग . - मोको . दंडुका , दंडुकणे , दंडूक , दांडूक , दंडोका पुन . सोटा ; बडगा ; दांडके ; काठी ; लांकडाचा लहानसा जाड तुकडा ; शिपायाच्या हातांतील सोटा . [ सं . दंड ] दंडुकेशाही स्त्री . मारहाण किंवा जुलूम करुन अंमल गाजविण्याची पद्धति ; पाशवी बल ; दांडगाई . पोलिसांची दंडुकेशाही अलीकडे फारच बोकाळली आहे . - केसरी १६ - ४ - ३० . दंडुक्या वि . काठीने मार देण्यास संवकलेला ; दांडगा ; जबरदस्त . दंडेरा वि . दंडारा पहा . दंडेल ली वि . दांडगा ; अरेराव ; अडदांड ; झोंड ; मुख्यत्वे , जो कर्ज परत फेडण्यास नाकबूल असतो तो ; दंडुक्या ( मनुष्य ). दंडेली स्त्री . अरेरावीची वर्तणूक ; दंडेलपणा ; दांडगाई ; जबरदस्ती ; अन्याय ; सामर्थ्याचा दुरुपयोग ( मुख्यत्वे देणे न देण्यासंबंधी ). दंड्य वि . १ शिक्षा करण्यास योग्य . २ दंड करण्यास योग्य . [ सं . ] दंड्याप्रमाणे क्रिवि . शिरस्त्याप्रमाणे . सामाशब्द - ०थडक स्त्री. खांद्याच्या बाहेरच्या भागाने केलेला आघात . [ सं . दंड + थडक ] ०दास दंडाबद्दल गुलाम होऊन राहिलेला मनुष्य . [ सं . ] ०धारी पु. यम . नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी । - राम २७ . - वि १ हातांत काठी असलेला . २ ( ल . ) संन्यासी . ०नायक पु. कोतवाल ; पोलिसांचा अधिकारी . सर्व सारीतु पातीनिले । दंडनायका पाशी । - शिशु ५०४ . ०नीति स्त्री. १ नीतिशास्त्र ; नीति ; संसारांतील वर्तुणुकीचे आणि व्यवहाराचे कायदे , नियम . यालाच दंडनीति , अर्थशास्त्र , व्यवहारशास्त्र , दृष्टार्थशास्त्र , ही जवळजवळ पर्यायशब्द आहेत . २ ( कायदा ) शिक्षा करुन दाबांत ठेवण्याचे शास्त्र . हे राजनीतीच्या चार भागांपैकी चवथे होय . ३ अर्थशास्त्र , आन्वीक्षिकी पहा . [ सं . ] ०पत्र न. न्यायांत खोटा ठरला म्हणजे त्यापासून दंड घेण्याचे पत्र . [ सं . ] ०पक्ष करण )- न . ( नृत्य ) पाय ऊर्ध्वजानु करणे व त्यावर उजवा हात लताख्य करीत राहणे . [ सं . ] ( करण )- न . ( नृत्य ) पाय ऊर्ध्वजानु करणे व त्यावर उजवा हात लताख्य करीत राहणे . [ सं . ] ०संयुतहस्त पु. ( नृत्य ) हात हंसपक्ष करुन बाहू पसरुन एका हाताने दुसर्या हातास एकदां कनिष्ठिकेपासून आरंभ करुन आंतील बाजूने बाहेरच्या बाजूस विळखा घालणे ; नंतर कनिष्ठिकेपासूनच पण बाहेरील बाजूने प्रारंभ करुन आंतील बाजूस विळखा घालणे . [ सं . ] ०पाणी पु. शिव ; यम . - वि . ज्याच्या हांतांत दंड आहे असा ; धट्टाकट्टा व दांडगा ; गलेलठ्ठ व झोंड ; आडदांड . [ सं . ] ०पाद आकाशी , चारी )- वि . ( नृत्य ) नूपुरपाय पुढे पसरुन क्षिप्त करणे म्हणजे कुंचित पाय उचलून दुसर्या पायाच्या बाहेरील बाजूस पोटर्यांचे स्वस्तिक होईल अशा प्रकारे टांचेच्या भारावर टेकणे व मग ते स्वस्तिकांतील पाऊल उचलून पसरणे व खाली टाकतांना अंचित करुन दुसर्या पायांत अडकविडे . [ सं . ] ( आकाशी , चारी )- वि . ( नृत्य ) नूपुरपाय पुढे पसरुन क्षिप्त करणे म्हणजे कुंचित पाय उचलून दुसर्या पायाच्या बाहेरील बाजूस पोटर्यांचे स्वस्तिक होईल अशा प्रकारे टांचेच्या भारावर टेकणे व मग ते स्वस्तिकांतील पाऊल उचलून पसरणे व खाली टाकतांना अंचित करुन दुसर्या पायांत अडकविडे . [ सं . ] ०पारुष्य न. १ कडक ; कठोर शिक्षा . २ काठीने हल्ला करणे ; छड्या मारणे ; ठोंसे देणे ; मारणे ( हात , पाय , शस्त्र इ० कांनी ). ३ ( कायदा ) हल्ला ; भय प्रदर्शक रीतीने हात किंवा काठी उगारणे , मारणे . [ सं . ] ०पूपिकान्याय पु. ( उंदराने काठी नेली त्या अर्थी तिला बांधलेली पोळी खाल्ली हे उघडच होय यावरुन ) कार्यकारण , अंगउपांग , प्रधानअप्रधान यांचा न्याय ; ओघाओघानेच प्राप्त झालेली गोष्ट . उदा० राजाचा जय झाल्यानंतर त्याच्या सेनेचा जय अर्थातच दंडपूपिकान्यायाने होतो . [ सं . दंड = काठी + पूपिका = पोळी + न्याय ] ०प्रणाम पु. साष्टांग नमस्कार ; लोटांगण . दंड प्रमाण करोनिया । - गुच ९ . ९ . ०प्राय वि. दंडासारखा ; साष्टांग ( नमस्कार ). करी दंडप्राय नमन । - गुच ४१ . १४ . ०फुगडी स्त्री. ( मुलींचा खेळ ) परस्परांच्या दंडांना ( किंवा खांद्यांना ) धरुन उभ्याने फुगडी खेळण्याचा एक प्रकार . [ दंड + फुगडी ] ०फुरई फुरोई पुरोई - स्त्री . १ दंडासाठी केलेली जप्ती ; दंड . २ ( अधिकार्याने ) बेकायदेशीर बसविलेला दंड ; बेकायदेशीर दंड बसविणे , ( क्रि० घेणे ; देणे ; भरणे ). ०वळी कोपरवळी - स्त्री . ( व . ) ( दंडावरची ) वांक ; स्त्रियांचा एक अलंकार . [ दंड + वेली ] ०वाट स्त्री. १ ( उजाड , भयाण असा ) लांबच लांब रस्ता ; जवळपास गांव , वस्ती नाही आअ रस्ता . २ टेकड्यांच्या कडेने गेलेली अरुंद पायवाट . ३ एकमेकास मिळणारे रस्ते . ०वानू वि. काठी , दंड , वेत्र इ० हातांत घेणारा . [ सं . ] ०विकल्प पु. शिक्षेची अदलाबदल ; शिक्षा कमी द्यावी की अधिक द्यावी याविषयी विचारणा . [ सं . ] ०सरी स्त्री. ( बागेमध्ये ) पाणी जाण्याकरितां खणलेला लहानसा पाट , चर , खाचण ; तसर्यांच्या बाजूचा पाट . [ दंड + सरी ] ०स्नान न. घाई घाईने केलेले अर्धवट स्नान ; नद्यादिकांच्या ठिकाणी अंग न चोळतां केवळ दंडमात्र भिजतील अशा प्रकारचे केलेले स्नान ; काकस्नान ; पाण्यांत एक बुचकळी मारुन केलेले स्नान . [ सं . ]
|