Dictionaries | References

दांड

   
Script: Devanagari

दांड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Rude, violent, bullying, over-bearing.
.

दांड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A long bamboo stick.
  Rude, overbearing.

दांड     

 पु. ताठरपणा . - वि . दांडगा ; अडदांड ; अडमुठा ; मस्त . दांडभांड गुराखी तुम्ही । - रासक्रीडा २२ .
 पु. १ वेळूची लांब काठी ; दांडा . २ पट्टा खेळण्याचा सराव करण्याची काठी . ३ शेताची मर्यादा दाखविणारा उंच बांध . ४ टेंकडीचा , डोंगराचा कणा , दंड , रांग . ५ उंचवट्यावरुन सखल प्रदेशाकडे पाटाने पाणी नेण्याची सारणी , प्रणाली , दंड . ६ ( व . ) ( धोतर , लुगदे इ० कांचे दोन तुकडे जोडणारी ) एक प्रकारची जाड व लांब शिवण . ( क्रि० करणे ). ७ ( शेतांमधून , शेताच्या बाजूने ) रहदारीकरितां सोडलेला जमीनीचा लांब पट्टा . ८ जमीनीचा , मार्गाचा लांबलचक , रखरखीत व ओसाड पट्टा . ९ ( फार वेळ एकाच स्थितित बसण्याने अंगाला येणारा ) ताठरपणा ; ताठकळा . ( क्रि० भरणे ). बसून बसून पाठीला दांड भरला . १० ( प्रां . ) ( मळ्यांतील ) वाफा , ताटवा . ११ ( - पुन . प्रा . ) ( शिक्षा म्हणून केलेला दंड ; ( विरु . ) दंड . ( क्रि० मारणे ). १२ चोवीस हात लांबीचा बांध ; चोवीस हात लांबीचे परिमाण . - कृषि २१३ . १३ चित्त्याच्या गळपट्ट्यापासून कंबरपट्ट्यापावेतो पाठीच्या कण्यावरुन बांधण्याची वेणी घातलेली सुताची दोरी . - चिमा १३ . १४ . ( गो . ) ( आट्यापाट्या ) सर्व पाट्यांना मधोमध विभागणारी रेषा ; दंड ; सूर . १५ ( ना . ) पाळण्याचा साखळदंड . १६ एकेक मोती . - शर [ सं . दंड ] ( वाप्र . )
०काढणे   ( मनुष्य , जनावर इ० कांस ) खूप राबवून घेणे ; तांगडणे ; ताण देणे ; पादाडणे . सामाशब्द -
०पट्टा   टा पु . १ एका हातांत काठी व दुसर्‍या हातांत पट्टा घेऊन खेळावयाचा एक मर्दुमकीचा खेळ . ( क्रि० खेळणे ; करणे ). २ सदर खेळ खेळण्याचे हत्यार . [ दांड + पट्टा ]
०पाळे  न. लांकडाची मूठ बसविलेले लांकडी पाळे .
०पेंडोळा   ळे पुन . १ ( प्रदेश , जमीन इ० कांची ) सीमा ; मर्यादा ; शींव ; हद्द ; परस्परसंबंधीची जागा ; निकटपणा ; संबंध . २ ( ल . ) विवाह अथवा इतर संबंधातील ( दोन्ही पक्षांची ) अनुरुपता ; योग्यतेचा सारखेपणा ; सारखी लायकी . ( क्रि० मिळणे ; पुरणे ; लागणे ). [ दांड + पेंडोळा = हद्द , बांध ]
०मेंड   पुस्त्री . सीमा ; हद्द ; शीव ; मर्यादा . त्या गावची दांडमेंड मारुतीच्या देवळापर्यंत आहे . [ दांड + मेंड = मर्यादा , सीमा ]
०यारी  स्त्री. ( नाविक कों . ) काठीस ज्या मुख्य यार्‍या शृंगारवितात त्यांच्या शिवाय आणखीहि बारीक दोरीच्या उपयार्‍या असतात त्यापैकी प्रत्येक . [ दांड + यारी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP