|
पु. १ धान्य . २ धान्याच्या समुदायापैकी , कणांपैकी प्रत्येक कण , नग , व्यक्ति . ३ धान्यकणाप्रमाणे असणारे मोत्ये , मणि , बीज , डाळिंबाचे बी इ० . ४ बरफी इ० काच्या ठिकाणी साखर जमून जे कण होतात त्यापैकी प्रत्येक . ५ ( कागद , चामडे इ० काच्या गुळगुळीत पृष्ठभागावर येणारी बारीक कणासारखी फुगोटी , टेंगूळ , नक्षी . खरार्याच्या आकाराच्या एका हत्याराने कातडे उभे , आडवे , किंवा चोहोकडून घासतात ; म्हणजे त्याव्र दाणा उमटतो . - ज्ञाको क २६३ . ६ ( कापड इ० कांच्या गांठीतील ) प्रत्येक नग . ७ उत्कृष्ट व एकेक नगाने विकले जाणार्या आंब्यांपैकी प्रत्येक नग . आम्बे मुरण्यास दाणे शुमार पन्नास . - रा २२ . १०५ . ८ किरमिजी रंगाचा कण . ९ सीताफळाच्या सालीवरील डोळ्यांपैकी प्रत्येक . १० एक प्रकारची जाडी साखर . [ सं . धान्यक - दाणअ - दाणा . तुल० फा . दाना ] ( वाप्र . ) दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - पदरचे खर्चून मुद्दाम भांडणे लावणे . म्ह ०उतरंडीला नसेना दाणा पण दादला असावा पाटील राणा . सामाशब्द - वि. १ धूर्त ; शहाणा ; चतुर ; दूरदर्शी ; चाणाक्ष . २ ( व्यापक . ) उत्कृष्ट ; गुणवान ; उत्तम ; फार चांगला ( मनुष्य , जनावर ). मुलगा दाणा आहे . पादशाहीस वर्तमान कळले तेव्हां बोलिले की दुस्मान दाणा गेला . - मराचिथोशा ८५ . [ फा . दाना ] दाणावणे - अक्रि . ( घोड्याने ) फार दाणा खाल्यामुळे ( तो ) कांही विकाराने , आजाराने युक्त होणे . [ दाणा ] प . ( ग्राम्य .) मदनछत्र . ०गल्ला पु. धान्य ; धान्याचा सांठा , कोठार . ०गोटा पु. ( व्यापक ) धान्यधुन्य ; धान्य , डाळी आणि इतर तत्सदृश जिन्नस . ०पाणी न. १ निर्वाह ; पोट भरणे ; आमचे दाणापाणी तुमचे पदरी आहे म्हणून आम्हांस तुम्ही पोशितां . ३ दाणागोटा ; चारापाणी . ४ मृताकरिता एक वर्षपर्यंत ब्राह्मणांस पोचविण्याचे धान्य व पाणी . [ दाणा + पाणी ] ०साखर स्त्री. फुल साखर काढून घेतल्यावर खाली राहणारी तांबूस साखर . कृषि ४८२ . दाणेआळी स्त्री . १ धान्याच्या दुकानांची पट्टी , गली . २ ( पुणे ल . ) दाणेबाजारांत वेश्यांची वस्ती आहे यावरुन . दाणेकरी पु . घोड्याच्या पागेला दाणा पुरविणारा मराठ्यांच्या अमदानांतील लष्करी अधिकारी . - वि . १ संसाराच्या निर्वाहास पुरुन विकण्यास उरेल इतके धान्य ज्याच्या जवळ आहे असा . २ धान्य विकणारा ; दाणेवाला ; धान्यव्यापारी . दाणेदार वि . १ ज्यांत दाणा उत्पन्न झाला आहे , भरला आहे असे ( कसणी इ० ). २ कणीदार ; रवाळ . ३ ज्याच्या पृष्ठभागावर दाणे उठले आहेत असा ( कागद , चामडे इ० ). [ फा . दानादार ]
|