न. - विक्रीसाठी ते ते पदार्थ मांडून बसण्यासाठी केलेले घर ; जागा ; विक्रीची जागा ; मांडामांड .
- सोनार , लोहार , कांसार इ० कांचे ते ते पदार्थ घडण्यासाठी केलेले घर , कारखाना .
- ( माल विकण्यासाठी मांडून ठेवलेल्या पदार्थाचा समुदाय .
- लोहार , सोनार , कांसार इ० कांची उपकरणसामग्री . मी दुकान आटोपून येतो . तुम्ही गोफ करविणार असलां तर मी दुकान घेऊन येतो .
- कांही एक व्यवहारार्थ अनेक पदार्थांचा पडलेला , मांडलेला पसारा . तुम्ही पोथ्यांचे दुकान मात्र मांडून ठेविता , शास्त्रार्थ काहीच ठरत नाही .
- ( गो . ) दारुचा पिठा ; गुत्ता .
- वस्तूंचे मांडलेले प्रदर्शन ; बाजार . [ अर ; दुक्कान ; फा . दुकान ; म . दुखण - राभा ] ( वाप्र . )
०घालणे स्थापणे रचणे मांडणे - ( अक्षरशः ) पदार्थाच्या विक्रीसाठी मांडामांड करणे .
- ( ल . ) ( एखाद्या स्त्रीने ) प्रसिद्धपणे द्रव्य घेऊन व्यभिचार करु लागणे ; कसबिणीचा धंदा करुं लागणे ; अनाचाराने वागणे .
०पसरणे पसारा मांडणे . रे ! काय दवाग्निपुढे पसरुनि दुकान कानन राहते । - मोउद्योग १३ . १०८ .
०मोडणे दुकान बंद करणे ; धंदा , व्यापार इ० पार न निवृत्त होणे .
०वाढणे ( एखाद्याची ) गिर्हाईकी वाढणे ; धंदा , व्यापार भरभराटीस येणे . सामाशब्द -
०कार पु. ( गो . ) दारु विकणारा .
०दार पु. दुकानाचा मालक ; दुकान चालविणारा माणूस ; वाणी .
०दारी स्त्री. दुकानदाराचे काम , धंदा ; व्यापार - धंदा . [ फा . दुकानदारी ]
०दारी - ( गोसावी , वेश्या इ० कांनी ) लबाड्यांचे जाळे पसरणे ; अनेकांवर पाश टाकणे .
फैलाविणे - ( गोसावी , वेश्या इ० कांनी ) लबाड्यांचे जाळे पसरणे ; अनेकांवर पाश टाकणे .
०पट्टी स्त्री. दुकानावरील , व्यापरावरील सरकारी कर .
०सरकत स्त्री. दुकानांतील भागीदारी . [ सरकत = भागीदारी ]
०सरकती वि. दुकानांतील भागीदार .