|
स्त्री. नृत्य . दृष्टीमध्ये निश्चलता , विकसितपणा व सात्विकता दाखविण्याचा अभिनय . हा अभिनय उत्साहवृत्तीस अनुकूल आहे . स्त्री. १ नेत्रगोलस्थित जे पाहण्याचे इंद्रीय आहे त्याची वृत्ति , कार्य तिने झालेले ज्ञान ; पाहण्याचे सामर्थ्य ; नजर . २ ( ल . ) ( एखाद्या गोष्टीकडे द्यावयाचे ) लक्ष्य ; अनुसंधान . निरंतर शास्त्राकडे दृष्टि ठेवावी तेव्हा शास्त्र येते . त्यास पागोटे द्यावयाचे खरे परंतु माझी दृष्टी चुकली . ३ ( ल . ) सत , असत जाणण्यासास कारणीभूत असलेली मनोवृत्ति ; एखादुयाकडे पहाण्याचा , एखाद्याशी बोलण्याचा . एखाद्याशी वगण्याचा . रोख ; कल ; मनोवृत्ति . अलिकडे त्याची दृष्टी फिरली आहे . ४ ( राजा . ) पाषाणाच्या देवाच्या मूर्तीस रुपे इ० कांचे डोळे बसवितात त्या डोळ्यांपैकी प्रत्येक . ५ दृष्ट ; वाईट , बाधक नजर . दृष्ट २ पहा . ( क्रि० होणे ; काढणे ). राधा म्हणत्ये हा ! मज पुत्रवतीची लागली दृष्टि । - मोस्त्री ५ . ५ . - वि . पाहणारा , दर्शी पहा . समासांत उपयोग जसे - गुणदृष्टि ; स्थूलदृष्टि ; दोषदृष्टी इ० . [ सं . ] ( वाप्र . ) ०ओळखणे ( एखाद्याच्या ) नजरेवरुनच , चेहर्यावरुन त्याचे मनोगत ओळखणे . ०काढणे उतरणे ओवाळून टाकणे एखाद्यास वाईट दृष्टीची झालेली बाधा मंत्रतंत्र , तोडगा इ०काने काढून टाकणे . खालून जाणे ( एखादी गोष्ट , वस्तु इ० एखाद्याच्या ) डोळ्याखालून , नजरेतून जाणे ; स्थूलपणे माहित असणे . ज्यांचे दृष्टीखालून गेले । ऐसे कांहीच नाही उरले । - दा १ . ६ . ९ . ०घालणे १ डोळा मोडणे , मिचकावणे , डोळ्याने इशारा करणे . २ ( एखाद्या गोष्टीकडे ) काळजीपूर्वक पहाणे , लक्ष देणे , मन लावणे . स्वर्गांगनेसी जरि साम्य आली । परंतु तेथे दृष्टी न घाली । - रामदासी २ . ४३ . ०चढणे गर्वाने फुगणे ; उन्मत्त होणे ; डोळ्यांवर धूर येणे . ०चुकणे विसरणे ; गोंधळून जाणे ; घोटाळ्यांत पडणे . ०चुकविणे चारणे - ( एखाद्याच्या ) डोळ्यास डोळा न देणे ; नजरेस पडण्याचे टाळणे . ०चोरणे नजर भारुन टाकणे ; नजरबंद करणे . की पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे । परि नवल लाघव तुझे । जे आपणपे चोरे । - ज्ञा १४ . ५ . ०ठेवणे देणे - राखणे - ( एखाद्या गोष्टीची , वस्तूची ) काळजी घेणे ; लक्ष देणे . ठेवीना गर्भीही दृष्टिस ती नीट जळहि सेवीना । - मोअश्व ४ . ८ . ०देखणे ( काव्य ) पाहणे . ०निवळणे १ बिघडलेले , आलेले डोळे पूर्ववत स्वच्छ होणे . २ ( ल . ) गर्व , ताठा , उन्माद नाहीसा होणे . ०पडणे होणे लागणे - ( एखाद्याच्या ) वाईट नजरेची बाधा होणे ; दृष्ट होणे . ०फांकणे १ गोंधळून जाणे ; भांबावून जाणे . २ नजर बेताल , ओढाळ होणे . ०फाटणे ( एखाद्याची ) आकांक्षा , महत्त्वाकांक्षा , हेतु इ० वाढणे , विस्तृत होणे . ०फिरणे १ राग येणे . येतां दृष्टी त्याची फिरली म्हणे । - रामदासी २ . ९८ . २ ताठा चढणे ; गर्व इ० ने दृष्टि अंध होणे ; धुंदी चढणे . ०बंद करणे - नजर भारुन टाकणे ; मोडून टाकणे ; नजर बंद करणे ; दृष्टि चोरणे . ०भर पाहणे - पोटभर , डोळे भरुन तृप्ति होईपर्यंत , मनमुराद पाहणे . पाहा जा सदृढ दृष्टि भरुनि । - दावि ४६ . ०मरणे तीच वस्तु अनेक वेळां पाहिल्याने , तीच गोष्ट अनेक वेळा केल्याने , तिच्याबद्दलची भीति , आश्चर्य , हिडिसपणा इ० वाटेनासे होणे . माडावर चढून चढून भंडार्याची दृष्टि मेलेली असते . दृष्टीची मुरवत राखणे ( एखाद्याच्या ) भावनेस मान देणे ; ( एखाद्यास ) न आवडेल अशी गोष्ट त्याच्या समक्ष न करणे . दृष्टीचे पारणे फिटणे जे पाहण्याविषयी उत्कठा आहे ते पाहण्यास न मिळाल्याने समाधान पावणे . दृष्टीत न आणणे न जुमानणे . ऐसे वदोनि आणित नव्हतासि च बा परासि दृष्टीत । - मोमहाप्रस्थानिक २ . २० . दृष्टीत न येणे ( एखाद्यास ) तुच्छ लेखणे ; कःपदार्थ मानणे . - मोकर्ण ६ . ६६ . दृष्टीने शिवणे डोळ्यांनी पाहणे . म्हणतो नाही शिवलो दृष्टि आढळून येणे ; नजरेस येणे ; अनुभवास येणे . दृष्टीस फांटा फुटणे दृष्टि फाटणे ; दृष्टीचे सामर्थ्य वाढणे . जैसे डोळ्यां अंजन भेटे । ते वेळी दृष्टीसी फांटा फुटे । - ज्ञा १ . २३ . चार दृष्टी होणे भेट होणे ; नजरानजर होणे . अडव्या दृष्टीने पाहणे वांकड्या , काण्या डोळ्याने पाहणे . दृष्टीचा अंमल पु . १ पाहण्यांत , नजरेत आलेला काळाचा अवधि . हा दरिद्र्याचा श्रीमंत झाला हे माझ्या दृष्टीच्या अंमलातले . २ नजरेचे कार्यक्षेत्र . कर्तबगारी . चित्र काढणे हे दृष्टीच्या अमलांत . दृष्टीचा खेळ पु . नजरेने , दृष्टीने करावयाची चमत्कृतिपूर्ण कुशलतेची गोष्ट ; नजरेचा खेळ . पाहून लिहिणे , चित्र काढणे , इ० दृष्टीचे खेळ आहेत . दृष्टीचा खोटा पापी वि . दुसर्याचे चांगले पाहून मनांत जळफळणारा ; मत्सरबुद्धीचा . दृष्टीचा पसारा पु . डोळ्यांना दिसणारे विश्व . त्या दृष्टीने त्या धोरणाने , बुद्धीने . पुत्राकडे पुत्रदृष्टीने पाहिले असतां ममता वाटते , नाहीतर सर्व एकच आहे . म्ह ० १ दृष्टीआड सृष्टी आणि वस्त्राआड जग नागवे = जे आपल्या देखत घडत नाही त्याला आपण जबाबदार नाही व त्याचा प्रतिकार करणेहि कठिण . २ ( व . ) दृष्टी माया भात भूक = दृष्टीस मूल पडले की माया उत्पन्न होते , व भात पाहिला तर भूक लागते . दृष्टीसमोर कांही वाईट घडले तर वाईट वाटते . सामाशब्द - ०अभिनय पु. ( नृत्य . ) पापण्या , पापण्यांचे केस , बुबुळे , बाहुल्या व भिंवया यांच्या मदतीने केलेल अभिनय . याचे ३४ प्रकार आहेत . तेः - कान्त , भयानक , हास्य , करुण , अद्भुत , वीर , बीभत्स , शांत , स्निग्ध , हृष्ट , दीन , क्रुद्ध , दृप्त , भयान्वित ; जुगुप्सित , विस्मित , शून्य , लज्जित , म्लान , विषण्ण , शंकित , मुकुल , कुंचित , जिह्म , अभितप्त , ललित , अर्धमुकुल , विभ्रांत , विलुप्त , आकेकर , विकसित , मध्यमपद , अधमपद व त्रस्त . ०कोन पु. विचार करण्याचे , पाहण्याचे धोरण , रोंख , मनोवृत्ति ; विचारसरणी . ( इं . ) अँगल ऑफ व्हिजन . आमचा दृष्टिकोन भिन्न असल्यमुळे त्यांनी योजिलेली भाषा आम्हांला साहजिकच पटत नाही . - मसाप २ . २ . १११ . [ दृष्टि + कोन ] ०गुण पु. नजरेने पाहिल्यामुळे पाहिलेल्या वस्तूंचे , मनुष्याचे बरे वाईट करण्याची ( एखाद्यांतील ) विशिष्ट शक्ति . ०गोचर वि. डोळ्यांना दिसणारे ; पाहतां येणारे ; दृष्टीस पडणारे . [ दृष्टी + सं . गोचर ] ०चरित क्रिवि . जाणूनबुजून , बुद्धिपुरस्सर केलेले ( पाप इ० ). - ज्ञाको ( क ) १३८ . [ दृष्टि + सं . चरित = आचरलेले ] ०चोर पु. दुसर्याचा डोळा चुकवून चोरण्याचा , पळण्याच्या ज्याचा स्वभाव आहे असा मनुष्य . [ दृष्टि + चोर ] ०देखत देखतां क्रिवि . समक्ष ; पहात असतांना ; डोळ्यांदेखत . [ दृष्टि ] ०पथ पु. दृष्टीची रेषा , टप्पा . [ दृष्टि सं . पथिन = रस्ता ] ०परीक्षा स्त्री. ( वैद्यक शास्त्र ) रोग्याच्या डोळ्यांवरुन , दृष्टीवरुन रोगाची चिकित्सा करणे . [ दृष्टि + परीक्षा ] ०पात पु. १ ( एखाद्या वस्तूवर , मनुष्यावर ) नजर पडणे , वळणे ; अवलोकन . २ नजर बाधणे ; दृष्ट लागणे . [ दृष्टि + सं . पात = पडणे ] ०पिंड पु. डोळ्यांतील पारदर्शक भिंग ; ( इं . ) लेन्स . कांही मुलांस जन्मतः दृष्टिपिंडास विकार होऊन , त्या पिंडाची पारदर्शकता नाहीशी होते . - बालरोग चिकित्सा १२६ . [ दृष्टि + पिंड ] ०फोड स्त्री. १ बारीक पाहणी ; चौकशी . २ डोळ्यांस त्रास होईल अशा प्रकारचे जिकीरीचे काम ; डोळेफोड सर्व अर्थी पहा . - वि . १ डोळ्यांना त्रास , ताण देणारे ( कलाकुसरीचे काम , किचकट लिखाण इ० ). २ ( क्व . ) डोळ्यांस हिडिस दिसणारे ; ओंगळ . [ दृष्टि + फोडणे ] ०बंध बंधन पुन . मंत्रसामर्थ्याने डोळे भारुन टाकणे ; नजरबंदी की पुढिलाची दृष्टी चोरिजे । हा दृष्टबंधु निफजे । - ज्ञा १४ . ५ . [ दृष्टि + सं . बंध , बंधन = बांधणे ] ०भरु वि. देखणा ; सुंदर ; डोळ्यांत भरणारा . [ दृष्टि + भरणे ] ०भेंट स्त्री. आसन्नमरण मनुष्यास त्याच्या लांबच्या पुत्रादिक आप्तांची झालेली शेवटची दृष्टादृष्ट . २ दृष्टादृष्ट ; नजरानजर . [ दृष्टि + सं . मंडल = वर्तुळ ] ०मणी पु. लहान मुलास दृष्ट होऊं नये म्हणून त्याच्या गळ्यांत मनगटाला बांधावयाचा कांचेचा पांढर्या ठिपक्यांचा काळा मणी . ०मर्यादा स्त्री. मनुष्याच्या डोळ्यांना जेव्हढा पृथ्वीचा भाग दिसू शकतो तेवढी जागा ; दृष्टीच्या टप्प्यांतील भूभाग ; क्षितिज ; काळीधार ; चक्रवाल . [ दृष्टि + मर्यादा = सीमा ] ०रचना रचनेचाउभार स्त्रीपु . ( काव्य ) डोळ्यांना दिसणारा इहलोकचा , सृष्टीचा पसारा . ०विकार पु. १ वाईट मनुष्याची ( लहान मुलास ) नजर लागून झालेली बाधा . २ दृष्टीचा रोग ; डोळे बिघडणे . [ दृष्टि + विकार = बाधा ] ०र्हस्वता स्त्री. लांबचे न दिसणे ; ( इं . ) शॉर्टसाइट . हा विकार मुलांना सात ते नऊ वर्षात होतो . एकाग्रतेने पाहाण्याने अगर वाचनाने हे व्यंग चांगल्या मनुष्यांसहि नवीन होऊ लागते . - ज्ञाको ( अं . ) ९५ . [ दृष्टि + सं . र्हस्वता = आंखुडपणा ] ०हेळा स्त्री. कृपाकटाक्ष . जयाचिये दृष्टिहेळाचि संसारु । निरसोनि जाय । - विपू २ . २८ . दृष्ट्यगोचर वि . अदृश्य ; न दिसणारे . [ दृष्टि + सं . अगोचर - इंद्रियगम्य नव्हे असे ]
|