Dictionaries | References

दौलत

   
Script: Devanagari

दौलत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : धन-दौलत, संपत्ति

दौलत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : आसपत

दौलत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Wealth, riches: also opulence, affluence, prosperous circumstances. दौलतीस वाळवी लागणें g. of s. To have one's fortune or prosperity under consumption or decline; to have the worm at the root.

दौलत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Wealth, riches.
दौलतज्यादा   May your wealth and dignity be increased.

दौलत     

ना.  द्रव्य , धन , पैसा , मालमत्ता , संपत्ती ;
ना.  ऐश्वर्य , वैभव , श्रीमंती .

दौलत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : धन

दौलत     

 स्त्री. १ संपत्ति ; पैसा . २ वैभव ; ऐश्वर्य ; समृद्धि . ३ जहागीर ; राज्य . शहाजी राजे यांसी दौलतेमध्ये पुणे परगणा होता . - सभासद ५ . हे दौलत कर्जरोगाने निरंतर ग्रस्त . - पया ३४३ . ४ सैन्य . झाडून बुणगेसुद्धा दौलत गर्द जाली . - ख ११ . ६०८६ . ५ सल्तनत ; साम्राज्य ; गादी . आपल्य आपल्यांत भांडून दौलत बुडविली हा लौकिक कशाला पाहिजे . - रा १३ . ६९ . [ अर . दौलत ] - तीचा खांब - वि . १ ज्याच्या बळावर कुटुंब किंवा राज्य भरभराटीस येते तो ; दौलत कमावणारा किंवा राखणारा . २ मुख्य मुसद्दी . - इमं २३६ . - तीस वाळवी लागणे - संपत्तीस , ऐश्वर्यास ओहोटी लागणे .
०काहीरा  स्त्री. विजयी राज्य . दौलत काहिरेमध्ये मुलूक आला . - रा १८ . ५५ .
०ज्यादा   ज्यादा स्त्री . १ राजदरबारांतील भालदाराचा , राजास उद्देशून राज्य भरभराटीस येवो या अर्थी जयजयकारवाचक शब्द . २ तमाशांतील नाच्यास उत्तेजनार्थे व चढाओढीमध्ये बक्षीस दिल्यानंतर तो करतो तो जयजयकार . ३ ( ल . ) तमाशांत नाच्या - पोराशी अगर कलावंतीणीशी भरसभेत केलेली शृंगारचेष्टा . ( क्रि० करणे ; होणे ).
०जादा   - प्रतिष्ठा वाढणे ( सरकारदरबारी ). त्याची दौलतजादा झाली !
होणे   - प्रतिष्ठा वाढणे ( सरकारदरबारी ). त्याची दौलतजादा झाली !
०दार   वान वंत वि . १ श्रीमंत ; संपत्तिमान २ सत्ताधीश ; राज्याधिकारी . पाहते अर्थी दौलतवंतास कोणी एक गोष्टीने सूख नाही . - ख १२१५ . खा वि . राज्याचा मित्र ; हितेच्छु महाराव जानोजी केवळ निखालस , सर्व प्रकारे दौलतखा स्वामींचा आहे . - रा १ . १४८ .
०बंकी  पु. महाद्वारपाल . - राव्य २ . १४ . मदार संपत्तीचे माहेरघर ; ऐश्वर्याची खाण ( जुन्या कागदत्रांतील एक पदवी ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP