Dictionaries | References

धजावणे

   
Script: Devanagari
See also:  धजणे

धजावणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एखादे काम करण्यास धडसाने पुढे येणे   Ex. तो निधड्या छातीचा म्हणूनच त्या किर्र रानात रात्रीच्या वेळी एकटा जाण्यास धजावला.
SYNONYM:
सरसावणे

धजावणे     

अ.क्रि.  १ ( गर्दीत ) जोराने घुसणे ; वाट काढणे ; सरसावणे . २ ( एखाद्या कार्याचा ) चिकाटीने पिच्छा पुरविणे ; ( एखाद्या कार्यात ) मन घालणे , लावणे . ३ एखादे कार्य करण्यास ) धाडसाने पुढे येणे ; सरसावणे . वाघ येतांच पुढे पाऊल टाकण्यास कोणी धजेना . ४ ( पीक , रोप इ० ) तरतरणे ; टवटवणे ; जीवदार होणे . [ सं . ध्रज = जाणे ]
अ.क्रि.  १ ( एखादे धाडसाचे कार्य करण्यास ) पुढे येणे ; सरसावणे ; पुढाकार घेणे . ती ( गोष्ट ) करण्यास कोणीहि पुढे धजावत नाही . - टिले ४ . २१ . २ धजणे इतर अर्थी पहा . [ धजणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP