|
क्रि.वि. अगदी नीट ; सरळ ; तडक ; थेट ( जाणारा रस्ता , मनुष्य ). पु. १ तराजूची दांडी ; रोवलेला मोठा तराजू , कांटा . ऐसे हे अनुभवाचेनि धटे । साचे जया । - ज्ञा ६ . ५३ . धट रोंवूनि रमानायक । पारड्यामध्ये घातला । - भवि ३१ . ५६ . मेकॉले साहेबानी ... कलकत्ता मुक्कामी एक भला मोठा धट लावून एके पारड्यांत आरबी , फारसी व संस्कृत ग्रंथ यांचे गठेठे ... घालून ... - नि ९४१ . २ गाडीत , खटार्यांत बारदान भरतांना गाडीचा मागे तोल जाऊं नये म्हणून मागील बाजूस जमीनीपासून साटीच्या बावखंडास टेंकून पुढच्या शिपायाप्रमाणे उभे करावयाचे दुबेळक्याचे लांकूड , टेंकू . ३ ( मुलकी खात्यातील ) मोजणीपत्रीकांतील तपशील , त्याचे पत्रक . ४ निश्चय . - मनको . - हंको . [ सं . बं . धट ] वि. धीट ; दांडगा ; धटिंगण ; धट्ट पहा . धटु झोंबोनि हरी शेत । दैवहत तो झाला । - एभा २३ . १३२ . टौणपा लौंद धट उद्धट । - दा २ . ३ . ३२ . धटासी आणावा धट । - दा १९ . ९ . ३० . [ सं . धृष्ट ] म्ह ० ( व . ) धटा खाई मिठाई आणि गरीब खाई गचांड्या . ०घेणे घेऊन बसणे धरणे धरुन बसणे ; सक्त तगादा लावणे . ०लागणे चालणे ( एखादी क्रिया , गोष्ट ) अव्याहत चालू असणे , केली जाणे . ०लावणे ( खाणे , पिणे , बोलणे , चालणे , लिहिणे , वाचणे इ० सारखी क्रिया ) बेसुमार व अव्याहत करीत राहणे ( पुष्कळशा मालाचे वजन करणे असल्यास मोठा धट रोंवून भराभर ठराविक हप्त्यांचे वजन करितात त्यावरुन हा अर्थ ). धटास लावणे एखाद्या खाजगी , वैयक्तिक क्षुल्लक गोष्टीची शहानिशा करण्याकरितां , पदरी घालण्याकरितां ती जाहीरपणे लोकांपुढे मांडणे .
|