|
स्त्री. भाग्यावस्था ; सार्थकता ; साध्य गांठलेली स्थिति ; कळस होणे ; मोक्ष . धन्यता करणे - धन्य मानणे ; धन्यवाद देणे . तर त्यानी तुझी किती धन्यता केली असती . - चंद्र ७६ . न. ( माण . ) धणे ; धने . स्त्री. भाग्यावस्था ; सार्थकता ; साध्य गांठलेली स्थिति ; कळस होणे ; मोक्ष . धन्यता करणे - धन्य मानणे ; धन्यवाद देणे . तर त्यानी तुझी किती धन्यता केली असती . - चंद्र ७६ . पु. १ धनुष्य . त्या पार्थकरिच निष्टले धन । - गीताचंद्रिका १ . ३० . २ बारा राशीपैकी नववी रास ; धनु राशि . [ सं . धनुस ] न. १ पैसा ; संपत्ति ; द्रव्य ; वित्त ; ( सोने , चांदी , गुरेढोरे , घरदार जमीनजुमला इ० ) मालमत्ता . २ द्रव्याचे साधन ; ज्यामुळे पैसा मिळतो ते . उदा० विद्या , शास्त्र , कला इ० ( समासांत ) कीर्ति - गृह - पुत्र - पाप - पुण्य - शौर्य - गो - पशु - कल्प - वित्त - मान - धन ; तपो - यशो - धन ; इ० ३ अत्यंत प्रियवस्तु . ४ मौल्यवान वस्तु . ५ ( गणित ) बेरजेचे चिन्ह ( + ); मिळवावयाची संख्या ; अधिक संख्या . एका दिशेस कार्य करणार्या प्रेरणा धन ( + ) चिन्हाने दर्शविल्या - यंस्थि ७ . ६ विजेचा एक प्रकार . धन विद्युत . याच्या उलट ऋणविद्युत . [ सं . ] ( वाप्र . ) धन लावणे - पाडणे - ( उप . ) उत्कर्ष पावणे ; वैभवास चढणे ; मानमरातब मिळणे ( विपरीत लक्षणेने योजतात ). पंचवीस वर्षे झाली आतां पुढे विद्या करुन धन लावाल हे समजत आहे . स्त्री. धण पहा . एकट्या विधवेची सर्व धन व्हावी ! - के २६ . ७ . ३० . ०पुरणे कांही एक पदार्थ मनमुराद उपभोगिल्याने आशा पूर्ण होणे . म्ह ० १ धन असे पाताळी तर तेज दिसे कपाळी = पैसा जवळ असला की तोंडावर साहजिकच तेज चढते . २ विशी विद्या तिशी धन = विद्या संपादन करण्याचे वय वीस वर्षे व पैसा तीस वर्षापर्यंत मिळतो . ०कुटा पु. उंदीर पकडण्याचे धनुष्यासारखे एक साधन , सांपळा . ०कुंबी स्त्री. खडे मारण्याचे धनुष्य ; गलोल . ०कनकसंपन्न वि. ( अप . रुपे ) धनकनक , धनक कनक सोने , पैसाअडका यांनी समृद्ध ; भरपूर श्रीमंत . [ सं . ] ०कुबेर पु. अतिशय श्रीमंत मनुष्य ; पैसेवाला ; लक्षाधीश . [ सं . ] धनको धनको नाम पु . पैसे उसने देणारा ; सावकार ; कुळांना कर्जाऊ रकमा देऊन त्याकडून व्याजासह मुद्दल घेऊन व्यवहार करणारा ; उत्तमर्ण . याच्या उलट रिणकोनाम . धनकोनाम तुकावणी । रिणको नाम विठ्ठल धणी । धनकोरिणको न . ( धनको आणि रिणको ) १ कर्ज देणारा व कर्ज घेणारा यांमधील संबंध ; सावकार व कुळ यांमधील व्यवहार . २ देणेदार ; अधमर्ण . मी तुझे धनकोरिणको लागत नाही . [ धन + रिण ] ०कुली स्त्री. १ लहान धनुष्य ; धनुकली . २ ( कों . ) गलोल ; धनकुंबी . ३ धनुष्याप्रमाणे शरीर किंवा अंग वाकणे . ०वई वि. धनुर्धारी . इंद्रधनुष्या सिते । कवण धनवई न घालिजे ते । - अमृ ६ . २५ . ०गर्वी वि. पैशाचा , श्रीमंतीचा ताठा असणारा . ०गाडा गाढा वि . श्रीमंत ; धनवान ; पैसेवाला . [ धन + गाडा = समृद्ध ] ०चळ पु. १ पैशाचे वेड ; द्रव्यलोभ . २ पैसा गेल्यामुळे लागणारे वेड . ०चिन्ह न. अधिक ( + ) चिन्ह . धनत्तर , धनंतर , धनवत्तर वि . १ श्रीमंत ; समर्थ ; बलिष्ठ ; थोर . कुबेराला कर्ज देण्याइतका धनत्तर तुझा बाप . - एक . २ गडगंज ; मुबलक ; पुष्कळ ; भरपूर ( पीक , पाणी इ० ). आमच्या विहिरीला उन्हाळ्यांत सुद्धा धनत्तर पाणी असते . ३ खूप मोठा ; विस्तृत ; विस्तीर्ण ( वाडा , पटांगण , देश इ० ). भले भले धनंतर वाडे हवेल्या जागा । - ऐपो ४२३ . ४ हुषार ; चलाख ; कुशल . [ सं . धनवत्तर ] ०तृष्णा स्त्री. पैशाची हांव ; लोभीवृत्ति . ०तेरस त्रयोदशी स्त्री . अश्विन वद्य त्रयोदशी ; या दिवसापासून दिपवाळी सुरु होते . व्यापारी या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात . अपमृत्यु टळण्यासाठी यमास दीपदान करावयाचे असते . बायकांचा नहाण्याच हा दिवस असतो . [ सं . धन + त्रयोदशी ; प्रा . तेरस ] ०द पु. कुबेर ; श्रीमंत ; लक्ष्मीपुत्र . धर्मा जी धनदसभा तीही शतयोजनायता रम्या । - मोसभा १ . ३१ . - वि . दाता ; धन देणारा . [ सं . धन + दा ] ०दर्प पु. पैशाचा अभिमान ; श्रीमंतीचा ताठा . [ सं . ] ०दौलत धान्य स्त्री . ( व्या . ) संपत्ति ; मालमत्ता ; पैसाअडका , दागदागिने , घरदार , शेतीवाडी , गुरेढोरे इ० इस्टेट . जैसे तुकयाचे धनधान्य समस्त । ओढोनि गेले जेथचे तेथे । [ धन + दौलत , धान्य ] ०पिशाची स्त्री. १ पैशाचे रक्षण करणारी हडळ . २ ( ल . ) अति लोभी कद्रू स्त्री . ०पिसा वि. पैशाचा अति लोभी ; पैशाचे वेड असलेला ०पुत्र पु. गर्भश्रीमंत ; मोठा धनवान . तैसेचि धनपुत्रा आटितां दुष्टे । - दावि ३९ . ०मद न. संपत्तीचा गर्व ; ताठा . ( क्रि० येणे ; चढणे ; होणे ). चोरा थोरासम करी उपकार । धनमद चोरि फार । - मानापमान . ३ . १ . - वि . संपत्तीने ताठलेला ; उन्मत्त झालेला . ०मस्त मत्त वि . संपत्तीने ताठलेला ; उन्मत्त झालेला . ०मस्ती स्त्री. पैशाने अंगी येणारा उन्मत्तपणा . ०माल पु. धनदौलत . ज्याने धनमाल सोडिला । - ऐपो ९७ . ०रमण पति पु . १ कुबेर . २ श्रीमंत माणूस . [ सं . ] ०रेषा रेघ स्त्री . ( हस्तसा . ) मनुष्याच्या तळहातावरील एक विशिष्ट रेषा . यावरुन पैसा किती व केव्हां मिळेल ते सांगतात . ( क्रि० उपटणे ; उमटणे ). त्याची धनरेषा उपटली म्हणून पैसा मिळू लागला . ०लाग लाभ पु . द्रव्यलाभ ; पैसा मिळणे . ( क्रि० लागणे ; मिळणे ; सांपडणे ). ०लुब्ध वि. ( काव्य . ) संपत्तीचा फाजील लोभी . धनपिसा . की धनलुब्धाचे तत्त्वज्ञान । परधन हरणार्थ । धनलोभ पु . धनाचा , द्रव्याचा हव्यास . ०लोभी वि. पैशाची इच्छा करणारा ; हांवरा . [ सं . ] ०वंत वान स्त्री . ज्याच्यापाशी पुष्कळ पैसा आहे असा . ०व्यय पु. पैशाचा खर्च . ०व्यवहार पु. १ पैशासंबंधीची देवघेव , कारभार . २ पैशासंबंधी खटला , निवाडा . ३ दिवाणी दावा , कारभार . धनशेट पु . ( उप . ) धनाढ्य व्यापारी किंवा पेढीवाला ; धनत्तर . ०संचय पु. पैशाचा सांठा . [ धन + संचय ] ०संपत्ति स्त्री. पैसाअडका . ०संपादन न. पैसा कमावणे ; धनार्जन . धनागमन न . धनप्राप्ति . धनागमनी अति कष्ट । धनरक्षणी कष्ट श्रेष्ठ । - एभा २३ . १७६ . धनागमनागमन न . धनाचे येणेजाणे . अथवा धनागमनागमनी । प्रबळ लोभ उपजे मनी । - एरुस्व ९३ . २९ . धनाढ्य वि . धनवान ; श्रीमंत . [ सं . धन + आढ्य ] धनार्थी वि . पैशाचा गरजू . [ सं . धन + अर्थ ] धनांध वि . पैशाने उन्मत्त झालेला . [ सं . धन + अंध ] धनात्यय पु . पैसा जाणे ; संपत्तिनाश . [ सं . धन + अत्यय ] धनाध्यक्ष पु . खजिनदार ; कोषाध्यक्ष . धनाशा स्त्री . पैशाची आशा ; संपत्तीची इच्छा ; द्रव्याची हांव . धनेश्वर वि . श्रीमंत ; मातबर ; तालेवार ; संपन्न ; संपत्तिमान . [ धन + ईश्वर ] धनेषणा स्त्री . द्रव्येषणा ; द्रव्याचा लोभ , इच्छा . [ धन + ईषणा ] धनोत्पादक वि . संपत्ति , पैसा आणणारा ; मिळविणारा . बॅरिस्टरी वगैरे धंदे उंसाच्या चरकाप्रमाणे धनोत्पादक नव्हत . - टि २ . ४२ .
|