Dictionaries | References ध धेड Script: Devanagari Meaning Related Words धेड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एक हलकी जात व तींतील व्यक्ति . दक्षिणेत बहुधा महाराला ही सं॥ लावितात . २ ( ल . ) एक शिवी ; वाईट कृत्य करणारा . तूं ब्राह्मण आहेस की धेड ! - प ५८७ .०कचका पु. ( धेडाचे भांडण ) ( ल . ) आरडाओरडीचे , निकराचे भांडण .०कावळा पु. कावळ्याची एक जात . हा अगदी काळा असतो . यास डोंबकावळा , महारकावला असेंहि म्हणतात [ धेड + कावळा ]०गा पु. ( तुच्छतेने ) धेड .०गुजरी वि. अनेक भाषांची सरमिसळ जीत आहे अशी ( भाषा ). अनेक भाषांची खिचडी . पन कित्येक बहाद्दर तर असे आहेत की मराठी धेडगुजरी भाषा तोंडात बसण्याचे कारण जे इंग्रजीचे ज्ञान त्याचाहि पन त्यांस गंध नसतो . - नि २३ . [ धेड + गुजरी ]०वाडा पु. १ धेड लोकांचा मोहल्ला ; महारवाडा . धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावे । - तुगा २९६ . २ ( ल . ) कडाक्याचे भांडण ; बाचाबाची ; आरडाओरड . ( क्रि० माजविणे ; मांडणे ). ३ ( ल . ) गोंधळ ; अव्यवस्था . [ धेड + वाडा ]०सुगी स्त्री. १ शेतकरी लोकांचे धान्य तयार होण्यापूर्वी धेडांनी आपले बलुत्याचे मिळालेले बाजरांत विक्रीस आणलेले , विकलेले धान्य ( अर्थात ते बाजार भावापेक्षा स्वस्त दराने विकावे कागते त्यावरुन ). २ ( ल . ) अल्पकाळ टिकणारी पण अतिशय स्वस्ताई . [ धेड + सुगी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP