Dictionaries | References ध धोंका Script: Devanagari See also: धोका Meaning Related Words धोंका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ भीतीचे कारण ; भय ; संकट . त्या वाटेने चोरांचा , वाघांचा कशाचा कांही धोका नाही . नाना धोके देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे । - दा १ . १ . ३६ . २ काळजी ; चिंता ; अनर्थाची शंका ; कुकल्पना . दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरी धोका लागला । - दा ३ . ७ . ६९ . त्या मार्गाने तूं खुशाल जा कांही धोका बाळगूं नको . ३ आपत्ति ; ओढवलेले संकट ; वाईट प्रसंग ; बंडाळी ; दंगा ; खरे झालेले भय . पुढे मागुता धोका आला । यमयातनेचा । - दा ३ . ५ . ५१ . यशवंतरावच्या धोक्यांत मी अनकाईवर होतो . ४ व्यापारांत तोटा ; बूड ; दुर्दैवाचा फटकारा . त्या व्यापारांत मला दोन हजाराचा धोका बसला . ५ ( ल . ) झोंका . [ हिं . धोखा ; गु . धोको ]०देणे फसविणे ; ठकविणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP