स्त्री. - मोठा जड धोंडा ; दगड ; खूप मोठी शिळा ; खडक . हे देहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामीचे कोंड । - ज्ञा ३ . २४२ .
- ( ल . ) व्यापारांत आलेली बूड .
- सरकारने लादलेला फार मोठा कर .
- मोठे संकट ; दुःख .
- दडपणारी काळजी ; चिंता . उरावर धोंड - गळ्यावर धोंड - डोईवर अथवा माथ्यावर धोंड .
- मोठा आळ , आरोप .
- ओझे ; भार . हिंदुस्थान दिवसेंदिवस अधिकाधिक दरिद्री होत असून हिंदुस्थान इंग्लंडच्या गळ्यांत एक बोजड धोंड झाली आहे . - टिव्या ( वाप्र . )
०डोकीवर - देणे - वळविणे , धोंड पडणे , येणे, चढविणे - अतिशय द्रव्यनाश होई असे दरवडा इ० संकट प्राप्त होणे . या व्यापरांत पांच हजारांची मजवर धोंड पडली .
- एखाद्या मनुष्यावर बळेने लादणे ( काम ).
- कांही मागणीविषयी एखाद्याकडून जुलमाने कबुली घेणे ; रुकार मिळविणे .
०गळ वि. दगडमय . जीत धोंडे पुष्कळ आहेत अशी ( जमीन ).
०दिवस पु. धर्मकृत्यास योग्य अशा दोन तिथीवृद्धीमुळे येणारा दिवस . भाकड दिवस .
०फूल न. दगडफूल ; पावसाळ्यांतील दगडा - लाकडावरची फुलासारखी उगवण .
०फोड्या वि. - पाथरवट .
- ( ल . ) दगडफोड्या पहा .
०भट्टी स्त्री. स्नान केले नसून स्नान केल्यासारखे दिसण्यासाठी गंध , भस्म इ० कांनी आपले शरीर सजविणे ; स्नानाशिवाय गंध लावणे . ( क्रि० करणे ). येतो हा धोंडभट्टी द्विज करुनि सदा तीर्थ द्याया पदांचे । - मसाप ४ . ३ . १६४ . - आगर ३ . १० . [ धोंडा + भट्टी किंवाधोंडभट ब्राह्मण ]
०महिना, मास पु. पुरुषोत्तममास ; अधिकमास ; मलमास ( या महिन्यांत धर्मकृत्ये होत नाहीत म्हणून ).
०मार पु. धोंड्याची मारामारी ; धोंड्यांनी मारणे , खाल्लेला मार ; दगडमार .
०वणी न. ( चव , लज्जत येण्यासाठी ) ज्यांत ठिकरी विझविली आहे असे ताक ; ठिकरी तापवून चटका दिलेले ताक . ( निंदार्थी ) ठिकरीचा वास लाविलेले ताक ; ताकतव . [ धोंडा + पाणी ]
०वाण, वायण वण न. - अधिकमासांत ब्राह्मणांस दिलेली वायने .
- दिंड ; आंत पुरण घालून उकडलेला कणकेचा गोळा ; धोंडा पहा . अधिक महिन्यांत याचे वाण देतात .
- अधिक महिन्यांतील ब्राह्मण भोजन .
०शीर स्त्री. मोठी शीर .
- पायाच्या टाचेवरची शीर .
- हाताची शीर .
- कानजवळची शीर . [ धोंड + शीर ]
धोंडा पु. - दगड . आप्तांसि न या तोंडा दावावे नृपपदावरि पडो धोंडा । -
मोकृष्ण ५० . २३ .
- अधिक महिन्यांत वायनासाठी , ब्राह्मणभोजनासाठी
केलेला कणकेचा पुरण घालून उकडलेला गोळा ; एक पक्वान्न .
- ( ल . )
मूर्ख ; दगड ; अक्कलशून्य माणूस .
- कठिण हृदयाचा मनुष्य ; निर्दय ,
पाषाणहृदयी माणूस .
म्ह ०
- देखला धोंडा घेतला कपाळी = अतिशय
चिडखोर आणि आततायी माणसास लावतात .
- पावला तर देव नाही तर धोंडा .
- धोंडा टाकून पहाव पडला तर आंबा नाही तर धोंडा .
धोंडा लोटणे घालणे एखाद्यावर मोठे तुफान आणणे ; कचाटे घालणे .धोंडे खणून काढणे पाया खणून काढणे ; निर्मूलन करणे ; पाळेमुळे खणून काढणे ; उखडणे ;
काढून देणे ; एखाद्याने अजीबात निघून जावे म्हणून हात धुवून त्याच्या
पाठीस लागणे .धोंडे मारुं लागणे - एखाद्यावर चालून जाणे ; मारावयास धांवणे .
- ( उप . ) वेडा होणे ; वेड लागणे .
धोंड्याखाली हात सांपडणे पेचांत अडचणीत येणे . धोंड्याचे दोर काढणे - कृपणापासून पैसे , पाषाणहृदयी मनुष्यापासून दया मिळावयास झटणे ;
अशक्य गोष्ट करावयाचा प्रयत्न करणे .
- अनुरुप साधनाचे सहाय्य नसतां
मोठ्या खुबीने आणि निश्चयाने मोठे उद्देश सिद्धीस नेणे .
धोंड्यावर धोंडे घालून करणे द्रव्यादि सहाय्य नसतां नाना प्रकारचे प्रयत्न करुन एखादे कार्य करणे ; नाना प्रकारच्या युक्त्या योजणे .धोंड्यावर धोंडे घालणे निष्फळ प्रयत्न करणे ; उपयोग नाही अशा गोष्टी करणे . धोंड्याशी कपाळ घासणे स्वतःस व्यर्थ शिणविणे ( मूर्खास शिकविण्यांत इ० ). हाती धोंडे घेणे अतिशय चिडणे ; मारावयास उठणे . पायावर धोंडा ओढून घेणे एखादे लचांड पाठीशी लावून घेणे .पायांवर धोंडा पाडून घेणे आपल्या अन्नांत माती पाडून घेणे , स्वतःवर संकट आपत्ति ओढवून घेणे . चार ठिकाणी धोंडे टाकून पाहणे स्वकार्य साधानार्थ अनेक स्थळी अनेक प्रयत्न करुन पाहणे .वाटोळा धोंडा पु. दुसर्याच्या पेचांत कधी न सांपडणारा असा धूर्त माणूस . दगड शब्द पहा . धोंडाळ वि. - दगडाळ ; खडकाळ .
- एकप्रकारची काळी जमीन ; हीत धोंडे फार
असल्याने आंत पाणी राहू शकते, म्हणून पिकास फार चांगली समजतात .
धोंडी स्त्री. मोठा दगड ; धोंडा ; धोंड .