Dictionaries | References

न भूतो न भविष्यति

   
Script: Devanagari

न भूतो न भविष्यति     

वि.  पूर्वी कधी झाला नाही व पुढे कधी होणार नाही असा ; अलौकिक . परी वाल्मिकासारिखा कवेश्वर । न भूतो न भविष्यति । - जै ८२ . ३३ . [ सं . न = नाही + भूतः = झाला + न = नाही + भविष्यति = होईल ]

न भूतो न भविष्यति     

पूर्वी कधीं झालें नाहीं कीं पुढेंहि होणार नाहीं अशा तर्‍हेची गोष्ट. अतिशय अपरंपार अशा अर्थानेहि वापरतात. हा चरण ज्यांत आहे ते चार श्लोक असेः
(अ) कृपणेन समो दाता न भूतो न भावष्यति । अस्पृशन्नैव वित्तानि यः परेभ्यः प्रयच्छति॥ (आ) जीवन्ति च म्रियन्ते च मद्विधाः क्षुद्रजन्तवः। अनेन सदृशो लोके न भूतो न भविष्यति॥(इ) भृत्यकार्य हनुमता कृतं सर्वमशेषतः । सुग्रीवसदृशो लोके न भूतो न भविष्यति॥ (ई) वेङ्कटाद्रिसमं स्थान ब्रह्मांडे नास्ति किंचन। वेङ्कटेशसमोदेवो न भूतो न भविष्यति॥ ‘तुझिया ऐसा पक्षपाति । आतां न भूतो न भविष्यति। पुराणमुखें राहेल कीर्ति। ऐसें कांहीं मज सांगे॥’ -मुक्तेश्वर. ‘तेसमयीं दुतर्फा यंत्रांचा कडाखा ऐसा जाहला कीं न भूतो न भविष्यति’ भाव ३४. ‘आणि त्या ब्राह्मणास न भूतो न भविष्यति शिव्या देऊं लागला. -मायेचा बाजार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP