Dictionaries | References न निरपण Script: Devanagari Meaning Related Words निरपण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 nirapaṇa n Scrapings and wipings of a dish of food. Pr. नि0 खाई तें मोठें होई मळ्यांत जाई तें केळें खाई. निरपण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. खरवड ; धूण ( जेवलेल्या ताटाची ); निपटा ; निरपून काढलेला अंश . [ निरपणे ] म्ह ० निरपण खाई ते मोठे होई मळ्यांत जाई ते केळे खाई . निरपणी - स्त्री . निरपण करणे ; खरवड , धूण काढणे ; निपटणी . निरपणे - उक्रि . १ निरडणे पहा . ताटांतील निपटून चिपटून काढणे , पुसून , निपटून घेणे . - ज्ञा ६ . २३४ . हा ते सांडिला निरपोनु । धाम निढळीचा । - कथा ५ . १३ . १४८ . २ ( ल . ) भोगणे ; फेडणे ; केलेले कर्म निस्तरणे ; निपटणे ; निष्कृति करणे . ३ हिसकून काढणे ; खेंचणे ; जोराने उपसणे ( म्यानांतून तरवार , केसाच गुंता , ओला कपडा इ० दुसर्याच्या हातांतून ). ४ खडसावणे ; खरडपट्टी काढणे ; अतिशय रागावणे . ( या प्रयोगांत तलवार शब्द अध्याहृत असतो ). मी बोलतांच त्याने मजवर निरपली . [ ? सं . निर्वहन ; निर्वपन ] म्ह ० भलत्या ठिकाणी हगावे आणि निरपत बसावे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP