Dictionaries | References न निरवणे Script: Devanagari See also: निरविणे Meaning Related Words निरवणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ ताब्यांत देणे ; स्वाधीन करणे ; सोंपविणे ; विशिष्ट सूचनांसह हवाली करणे ; व्यवस्था सांगणे . निरवणे धरणे सुखदायका । - दावि १३२ . गड निरवितो गडकर्याला राज्य निरवितो नेतोजिला । - ऐपो १७ . २ कार्य सोंपविणे ; समर्पिणे . तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी । मग मज हरि उपेक्षिना । - तुगा २२०७ . ३ पाठविणे ; निरोप देणे . भीमक शुद्धमति गहिंवरोन । रुक्मिणीसी निरविती । - ह २४ . १७३ . ४ देणे ; नेमणे . हे कन्या त्याचि धन्या कृतिसि निरवली साच त्याचीच भाजा । - आसी ३१ . ५ सांगणे ; बजावणे . अश्वपति बापे सात वेळां निरविले । - वसा ६२ . [ सं . निर्वर्तन ? ] निरवानिरव - स्त्री . आटोपाआटप ; आवरासांवर ; प्रवासाला निघतांना किंवा मरतांना घर , मुले , जनावरे इ० सर्व गोष्टींची विल्हेवाट लावणे ; व्यवस्था करणे ; अनेक पदार्थांची अनेकाजवळ व्यवस्था लावणे . [ निरवणे द्वि . ] निरवानिरवीची वेळ - स्त्री . अंतकाळ ; निर्वाणीची घटिका . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP