Dictionaries | References न निरसणे Script: Devanagari Meaning Related Words निरसणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. काढून टाकणे , दूर करणे , परिहार करणे . निरसणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : निवारणे निरसणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ फेंकून देणे ; दूर ; बाजूला सारणे ; वर्जणे ; काढून टाकणे ; घालविणे ; नाश करणे ; टाकून देणे . निज बोधे संसारदुःख । निरसूनि दिधले निजमुख । - एभा १० . ३४७ . जेणे नामसंकीर्तन करुनिया । निरसली सकळ प्रपंच माया । २ मिथ्या ठरविणे ; समजणे . तैसे विचारितां निरसले । ते प्रपंचु सहजे सांडवले । मग तत्वता तत्त्व उरले । ज्ञानियासी । - ज्ञा २ . १३१ . तुका म्हणे आस निरवली । - तुगा ५३ . - अक्रि . संपणे ; जाणे ; दूर होणे ; गळणे ; कायमचे नष्ट होणे . जैसी रात्र निरसतां उठती जन । - रावि ७ . ८४ . प्राप्त होतां आत्मज्ञान । भ्रांतितम निरसून जाय स्वये । [ सं . निर + अस = फेकून देणे ] निरसन - न . १ परिहार ; निरसण्याचा व्यापार . संकटनिरसन . २ नाकारणे ; अस्वीकार ; टाकणे ; फेंकणे . [ सं . ] निरसनी - स्त्री . निरिच्छा ; वीट ; तिटकारा . निरशी अर्थ २ पहा . नेदीच तो निरसनी धरिली मुकुंदे । - अकक २ , कृष्णकौतुक ५० . [ नि + रस ] निरसित , निरस - वि . फेंकलेले ; दूर केलेले ; नाकारलेले . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP