Dictionaries | References न निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा? Script: Devanagari Meaning Related Words निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (आपापला निराळा शिधा घेऊन स्वयंपाक करावा). ज्यानें त्यानें आपल्यापुरतें पहावें. एकदां एकत्र कुटुंबांतून निघून वेगळें झाल्यावर व स्वयंपाक वेगळा करुं लागल्यावर मग तितका कुटुंबात आपलेपणा राहत नाहीं. परस्परांबद्दल परकीभाव उत्पन्न होतो.[ ओयरा = शिधा ] ज्या लोकांचा शिधा निरनिराळा असतो म्हणजे ज्यांचा स्वयंपाक वेगळा होतो त्यांचा परस्परांशी संबंध राहात नाही. एकदां भाउभाउ वेगळे होऊन निरनिराळा स्वयंपाक करूं लागले म्हणजे हळूहळू ते एकमेकांस दूरावतात. मग त्यांचा तसा अर्थाअर्थी संबंध राहात नाही. यावरून फाटाफूटएकी नसणेंवेगळेपणा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP