Dictionaries | References

नेके

   
Script: Devanagari
See also:  नेक , नेकी

नेके     

 स्त्री. १ अंतःकरणाचा खरेपणा , शुद्धपणा ; प्रामाणिकपणा ; सत्यता ; ऋतुजा . अल्पहेतूस्तव किंवा महदहेतुस्तव आपली नेक सोडू नये . २ नेकबाजी ; सद्वर्तन ; सरळ मार्ग , व्यवहार , आचरण . - वि . १ सद्गुणी ; प्रामाणिक ; विश्वासू ; सरळ ; खरा , चांगला ; नीतिमान ( माणूस , काम ). २ योग्य ; युक्त ; घाटाखाली राहणे नेक नव्हे . - पेद ६ . ३६ . [ फा . नेक ] नेकीचा - वि . खरा ; नीतिमान ; सद्गुणी ; चांगला ; प्रामाणिक .
०खाही  स्त्री. हितेच्छा . नेकखाई जाहीर करणे . - रा १७ . ३१ . [ नेक + खाई ]
०जात   जाद वि . १ प्रामाणिक ; इमानी ; सचोटीचा ; नेक पहा . मराठे लोक कजाखी , बहुत नेकजात , एकदील . - मराचिथोरा ७६ . २ प्रतिज्ञा पाळणारा ; सत्यसंध . आतां नेकजात नेक जयाजी शिंदे मात्र आहेत . - भाब ५२ . [ फा . नेक्झात ]
०दार वि.  प्रामाणिक ; नेकजात . तो पुरुष चाकरीस नेकदार आहे . - गोखचिशाब ३७ . - क्रिवि . प्रामाणिकपणे . असे कामदार नेकदार वागले म्हणून राज्य चालले . - रा ६ . ५११ .
०नजर  स्त्री. ( पत्रव्यवहारांत ) अनुकूल , मेहेरबानीची दृष्टि ; कृपादृष्टी . साहेबाचे नेकनजर करुन सेरी कराची बखेर सलामत असे . - रा १५ . ७६ . [ फा . नेकनझर ]
०नाम वि.  चांगला ; प्रख्यात ; कीर्तिमान . आणि सर्वात नेकनामही असावे . - रा ६ . ३७७ . [ फा . नेक + नाम ]
०नामदार वि.  ( पत्रव्यवहार ) सद्गुणी ; कीर्तिमान ; प्रख्यात ; प्रामाणिक ; एक मोठी पदवी ( गव्हर्नर , प्रीव्हीकौन्सिल , पार्लमेंटचे सभासद इ० ना असते ). ( इं . ) राईट आनरेबल .
०नामवरी  स्त्री. सुकीर्ति . - जोरा १२९ .
०नामी  स्त्री. लौकिक ; कीर्ति . नेकनामी व बदनामी हे शब्द फक्त मुलांस व अल्प समजुतीच्या बायकांस फसवणिपुरतेच आहेत . - इलासुंदरी ( मकरंदमाला २० ).
०नियत  स्त्री. सुबुद्धि ; सद्बुद्धि . - वि . सद्बुद्धिचा . टोपीवाल्यांत इंग्रजी बादशहा बहुत नेकनियत . - ख ७ . ३५६४ .
०बाजी  स्त्री. नेक , नेकी अर्थ २ पहा .
०बोल वि.  सत्य , खरे बोलणारा .
०राह  स्त्री. सरळ , चांगली राहणी , रीत ; चांगले वळण , चाल . नेकराह चाल दाखवून आमच्या राज्याचा आसरा पुरता केला . - ऐटि ५७ .
०सल्ला   स्त्रीपु . खरा , चांगला उपदेश , सल्ला . ( क्रि० देणे ). मुरारराव घोरपडे यांचे विचार करितां बहुत उत्तम आहे . ते सांगतील ते नेकसल्लाच सांगतील . - पया ८१ . - दिमरा १ . ६७ . नेकी नेकबाजी स्त्री . नेकमध्ये पहा . नेकबदी बादी स्त्री . नकी बदी ( चांगल्या वाईट गोष्टी ) दैवी , नैसर्गिक , किंवा मानवी या प्रकारच्या घडणार्‍या चांगल्या वाईट गोष्टी , प्रसंग ; बरावाईट प्रकार ; अस्मानीसुलतानी ; देवकी - राजकी . तुम्हास घोडा देतो परंतु नेकीबदी झाल्यास मी भरुन घेईन . नेकीबदीचा अंदेशा दोन्हीकडून सेवकाकडे नसावा . - पया २५६ . [ नेकी + बदी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP