Dictionaries | References

पांचावर धारण बसणें

   
Script: Devanagari

पांचावर धारण बसणें     

पूर्वी फार महागाई झाली म्हणजे रुपयास पांस शेर धान्य. मिळे. तेव्हां एवढी धारण झाली म्हणजे लोक अस्वस्थ होत. यावरुन गर्भगाळित होणें, घाबरुन जाणें.
पूर्वी लष्करांत वगैरे फार महागाई झाली म्हणजे रुपयाला पांच शेर धान्य मिळूं लागे व मग सर्व लोक अगदीं हवालदील होऊन जात. कारण सामान्यतः तेव्हां फार स्वताई असे. याप्रमाणें धारण बसणें म्हणजे अगदीं हलाखीची, निकृष्ट अवस्था होणे. यावरुन अगदीं घाबरुन जाणें, हवालदील होणें
भीतीनें गांगरुन जाणें असा लाक्षणिक अर्थ होतो. मॅनवेरिंगनें पांच इंद्रियांवरचा ताबा उडणें हा अर्थ दिला आहे तो चुकीचा आहे. ‘मराठयांची हैबत खाण्याचें कारण दुराणींच्या लक्षांत आलें नाहीं. तरीपण, त्यांची पांचावर धारण बसल्याचें त्यांना स्पष्ट दिसूं लागलें.’
पामो २८५. ‘आधुनिक सुधारणेनें दिलेल्या दिव्यांच्या योगें जशी “दिव्याखालीं अंधार” ही म्हण खोटी पाडली तशी प्रचलित आश्चर्यकारक महागाईनें पांचावर धारण बसणें ही मूळ अत्यंत महर्गतनिदर्शक म्हणही पार खोटी ठरवली आहे.’
केसरी ता. १९-१-४
पा.४.
पांच पहा. अन्नान्न दशा होणें
घाबरणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP