|
पु. क्रि.वि. पुरे ; पुरेसा ; ठीक . व्यासांवर युरोपीय पंडितांनीं अलीकडे जो चोरीचा चार्ज आणला आहे तोच बस आहे . - नि ५०० . - स्त्री . ( अशिष्ट ) वैपुल्य ; रेलचेल ; कमाल . त्यानें गाण्याची बस करुन दिली . [ फा . बस ] ( वाप्र . ) दृढता ; निश्चितपणा ; कायमपणा . ०करणें अक्रि . थांबणें ; विरमणें ; राहणें . बस भाई उद्गा . थांब ! पुरे बाबा ! स्थिस्रथा वरतेची स्थिति ; जम ; वजन ; छाप ; पगडा . ( व . ) बसोटी . ( क्रि० बसणें ). ज्या व्यवहारांत ज्याचा बस बसला तो त्यास सुकर . [ बसणें ] बसक - स्त्री . आसन ; आस्तरण ; बैठक ; बिछाईत ( जाजम , खुर्ची इ० ). तृप्ति . कंटाळा दाखविण्यासाठीं योजतात ( क्रि० होणें . कर्त्याची षष्ठी ). [ हिं . बसभाई ] बैठक ; खुर्ची ; तळखडा ; ( सामा . ) आधार . बसकी ; तळ ; बूड ; पाय ; बुंधा ; अडणी . या दऊतीची बसक लहान म्हणून आपटते . बसकी ; बाजारांत घातलेल्या दुकानावरील कर , पट्टी . बसकीची जमीन ; सपाट , सखल जमीन ; दरी ; बदखल . जमीनीचा खोलगट भाग ; लवण . जमीनीवर ठाम बसून राहणें ( थकव्यामुळें , हट्टानें - मनुष्यानें , पशूनें ). ( क्रि० घेणें ; मारणें ). बसक - वि . सखल ; खोलगट ( जमीन ). बसकट - स्त्री . दमल्यामुळें , हट्टानें , ( तगादेवाल्यानें ऋणकोला ) रोखण्याकरितां जमीनीवर थबकल घालून बसणें ; हातपाय मोकळे सोडून बसण्याची क्रिया ; बैठक . ( क्रि० घेणें ; मारणें ). ही म्हैस उभी आहे तों दूध काढा . एकदां बसकट मारली म्हणजे उठणार नाहीं . - वि . सखल ; थपकट ; चपटें ; सपाटसर ; याच्या उलट उभट , उभार . बसकें ; फेंदरें ; नकटें ( नाक ). बसकट नाक्या - वि . फेंदरा ; नकटा . बसकण - न . आस्तरण ; बैठक . बसक ( - स्त्री . ) पहा . बसकट , थबकल ( - स्त्री . ) पहा . ०कण घेणें मारणें - सिद्धीच्या निराशेनें हातीं घेतलेलें काम सोडून देणें . ०कर कार कूर बस्कर बस्कार - स्त्रीन . हांतरी ; चटई ; जाजम ; घडवंची ; मुलांनीं शाळेंत बसावयास आणलेलें गोणपाट इ० आसनाप्रमाणें पसरलेली , ठेवलेली कोणतीहि वस्तू . ( हेट . ) बस्टुक . [ सं . विष्टर ] ०कल स्त्रीन . बसण्यास फुरसत ; वेळ ; सवड ; संधि ( बहुधा नकारार्थी प्रयोग ). तो सारा दिवस फिरतो त्यास क्षणभर बसकल सांपडत नाहीं . - वि . कमी उंचीचें ; आखूड व पसरट ; नीच व सपाट . बसकें ; फेंदरें ; नकटें ( नाक ). खोलगट ; खालपट ( जमीन ). का - स्त्री . ( राजा . ) बैठक ; आसन ; खुर्ची . तळ ; पाया ( वस्तूचा ). - वि . बेताच्या उताराचा ; आडव्या घाटाचा ; याच्या उलट पाणढाळ ; खर . सपाट ; थबकट . ०की स्त्री. विटीदांडूच्या खेळांतील एक शब्द . बसका अर्थ १ व २ पहा . चुंबळ . - वि . चुंबळीसारखें बसकट ( पागोटें ). तिवट बस्की साधें . - समारो १ . २०१ . ०कीचा वि. तळ , पाया , बैठक , असलेला . बसण्यालायक ( घोडा , बैल , गाढव ). ०कूर स्त्रीन . बसकर पहा . बसकेचा वि . तळ , पाया , बैठक , आधार असलेला . ०कोळी स्त्री. बसकट मातीची घागर . यथाविधीनें त्या येरी । बसकोळ्या घागरी । - तुगा २८० . बसण स्त्री . ( कर . ) बसण्यास घेतलेली लाकडी वस्तु बसणी स्त्री . बसणें ; बैठक ; मांडी ठोकून बसणें . एका बसणीस म्यां शंभर बंद लिहिले . बूड ; आसन . ( कों . ) लहान पाट . ०फुगडी स्त्री. बसून घालावयाच्या फुगडीचा खेळ . बस फुगडी बसुंगा । चतुर भुंगा लालुंगा । एक पाय खोलीतो । सीताराम बोलीतो । - मसाप २ . २३४ .
|