Dictionaries | References

बाणणें

   
Script: Devanagari

बाणणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To pierce or enter deeply into the mind; to be impressed--a discourse, a lesson. Ex. एक अनुभवी जाणे ॥ जाणीव ग्रासलिया त्यासि बाणे तरी बाणे ॥; also ऐसीकौशल्येसी स्थिति बाणली पूर्ण ब्रह्म ॥. 2 To adorn or beseem. Ex. कृष्णशोभा पाहावया वेगें कामिनी ॥ अस्ताव्यस्त इंद्रिया बाणलीं लेणीं ॥; also कायिक तप तें कर्मकांड जाणा ॥ तुकयाचे अंगीं बाणलें लेणें ॥.

बाणणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Enter deeply or sink into the mind. Adorn. Ex. अस्ताव्यस्त इंद्रिया बाणलीं लेणीं.

बाणणें     

अ.क्रि.  
बिंबणें ; प्रवेशणें ; चिकटणें ; प्रतीतीस किंवा अनुभवास येणें ; पटणें ; मनांत पुरतेपणीं ठसणें ( अभ्यास , पाठ इ० ). बाळपणींच जयाच्या शस्त्रास्त्ररहस्य मानसीं बाणे । - मोशांति ६ . ३१ .
परिधान करणें ; अंगांत घालणें . कां जिये एकी वस्तूलागीं । बाणोनि ज्ञानाची वज्रांगी । - ज्ञा ६ . ४७५ .
शोभणें ; योग्य दिसणें ; ठीक बसणें . सांबासी स्त्रीनट । अतिवरिष्ठ बाणला । - एभा १ . ३४६ .
स्वीकारणें . कीं भक्ति सुखालागीं । आपणपेंचि दोहीं भागीं । वांटूनियां आंगीं । सेवकै बाणी । - ज्ञा १२ . १८६ .
स्थिरावणें ; शमणें . प्राप्तभोगें तृष्णा न बाणें । - एभा १७ . २२६ .
बाणा बाळगणें . [ बाण = तीर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP