|
पु. वि. १२ ही संख्या . [ सं . द्वादश ; प्रा . बारह ] ( वाप्र . ) कुंभाराच्या भट्टीचें खालचें तोंड . ०करणें बाराचें करणें म्हणणें बाराचा फाडा वाचणें बाराचे लेख वाचणें - सफाईनें किंवा धूर्ततेनें पळून जाणें ; पोबारा करणें . ०गोष्टी कथा सांगणें करणें गाणें बारापंधरा करणें सांगणें बाराबत्तिशा लावणें - असंबद्ध बोलणें ; खोट्या सबबी सांगणें ; कांहीं तरी सांगणें ; धरसोडीनें बोलणें ; उडवाउडवी करणें ; भाकडकथा सांगणें . बंदराच्या समोरचा भाग . [ सं . द्वार ] ०वाजणें ( ल . ) उतरती कळा लागणें ; समाप्त होणें ; नाश होणें ; दिवाळें निघणें . ०वाजविणें ( ल . ) नाश करणें ; विध्वंस करणें . ०वाटा - उधळून लावणें ; उधळणें . करणें - उधळून लावणें ; उधळणें . ०वाटा , होणें - पळणें , होणें - अजिबात नाहींसा होणें . चारी दिशांनीं सैरावैरा पळणें ; दाणादाण होऊन पळत सुटणें ; ( सैन्य इ० ) फजिलखान बारा वाटा । - ऐपो २१ ०वाटा जाणें - पैसा , संपत्ति , सांठा इ० खर्च होणें . उधळिला जाणें - पैसा , संपत्ति , सांठा इ० खर्च होणें . ०वाटा होणें - मनमानेल तसें वागण्यास पूर्ण मोकळीक असणें . म्ह० पळणारास एक वाट ; शोधणारास बारा वाटा . मोकळ्या होणें - मनमानेल तसें वागण्यास पूर्ण मोकळीक असणें . म्ह० पळणारास एक वाट ; शोधणारास बारा वाटा . ०गांवचा , पिंपळावरचा - एके ठिकाणीं न राहतां सदां भटकत असणारा . मुंज्या , पिंपळावरचा - एके ठिकाणीं न राहतां सदां भटकत असणारा . ०गांवचें प्यालेला , बंदरचें प्यालेला - लफंग्या ; वस्ताद ; चवचाल ; बारा बंदराचें पाणी प्यालेला ; फार प्रवास केल्यानें चतुर व धूर्त बनलेला . पाणी प्यालेला , बंदरचें प्यालेला - लफंग्या ; वस्ताद ; चवचाल ; बारा बंदराचें पाणी प्यालेला ; फार प्रवास केल्यानें चतुर व धूर्त बनलेला . ०घरचे - भिन्न भिन्न स्थळांचे भिन्न भिन्न प्रकृतीचे एकत्र जमलेले लोक ; परस्परांशीं कोणत्याहि नात्यानें संबंध नाहीं असे लोक . बारा - भिन्न भिन्न स्थळांचे भिन्न भिन्न प्रकृतीचे एकत्र जमलेले लोक ; परस्परांशीं कोणत्याहि नात्यानें संबंध नाहीं असे लोक . ०मांडवांचा - पु . सदोदित अनेक ठिकाणीं अनेक तर्हेचीं कामें असलेला इसम . बारावें वर्ष पालटणें किंवा लागणें - ( ल . ) बारा वर्षाच्या मुलाप्रमाणें वर्तन करणें . म्ह० वर्हाडी - पु . सदोदित अनेक ठिकाणीं अनेक तर्हेचीं कामें असलेला इसम . बारावें वर्ष पालटणें किंवा लागणें - ( ल . ) बारा वर्षाच्या मुलाप्रमाणें वर्तन करणें . म्ह० उदीम करतां सोळा बारा ; शेती करतां डोईवर भारा . बारानायकी - स्त्री . अव्यवस्थित राज्य ; बंडाळी ; अराजकता . शिरजोर लोकांच्या कारभारामुळें कामांत होणारा घोटाळा बारभाई - स्त्री . ( ल . ) अनेक मतांच्या , स्वभावांच्या लोकांनीं मिळून केलेलें काम ; अनेकांच्या हातीं असलेली सत्ता . गोंधळ ; अव्यवस्था . बारभाईंचा कारखाना , कारभार , खेती - पुस्त्री . अव्यवस्थित कारभार किंवा स्थिति . लोकप्रतिनिधींचा कारभार ( नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर नाना फडणवीस , सखाराम बापू इ० मुत्सद्यांनीं चालविलेला कारभार ). बारभाईंचा कारभार दिल्लीस आजपर्यंत कोणत्याहि गृहकलहानंतर चालला नाहीं . - भाऊ ९६ . ( ल . ) गोंधळ ; ज्या कामांत किंवा उद्योगांत पुष्कळ मंडळीचें अंग असतें आणि प्रत्येक जण यजमानासारखे हुकूम सोडीत असतो परंतु त्या हुकुमांची बजावणी मात्र कोणी करीत नाहीं अशा तर्हेचा गोंधळ . म्ह० ( व . ) बारभाईची खेती प्रजापती लागला हातीं = घरांत कारभार करणारे पुष्कळ असले व कोणीच जबाबदार नसला तर फायदा होत नाहीं . बारभाईची गाडी - स्त्री . उतारुंची व टपालाची घोडागाडी ( इंग्रज कुंपिणीच्या पहिल्या अमदानींत ही गाडी मुंबई - पुणें याच्या दरम्यान होती ). बारभाईचें कारस्थान - न . अगदीं भावासारखी एकमतानें वागणारी जी मंडळी तिनें केलेलें कारस्थान ; श्री . नारायणराव पेशवे मारले गेल्यानंतर राघोबादादांच्या विरुद्ध कारभारी मंडळीनें केलेला कट . बारमास , बारमहां , बारमाही - क्रिवि . वर्षभर ; बारा महिने ; सतत . - वि . बारामहिन्यांचें . [ बारा + सं . मास ; फा . माह ] बारवर्षी , बारवरशी , सोळवर्षी , सोळवरशी , बारावर्षे , सोळावर्षे - पुअव . ( बारावर्षीचे व सोळा वर्षाचे ) अननुभवी तरुणांची सभा ; ज्या व्यवहारांत एकहि प्रौढ मनुष्य नाहीं व सार्व एकजात तरुण आहेत अशी मंडळी . सामाशब्द - बारा अक्षरी - रेशमाची एक जात . बाराखडी . ०आदित्य पुअव . ( बारा सूर्य ) वर्षांतील सूर्याचीं बारा रुपें . ०कशी स्त्री. बार ( रा ) बंडी - दी ; बारकशी . [ कसा = बंद ] ०कारु पुअव . बलुतेदार पहा . बाराखडी , बारस्कडी , बारखडी स्त्री . व्यंजनापासून १२ स्वरांच्या मिश्रणानें पूर्ण होणार्या अक्षरांची मालिका . [ बारा + अक्षरी ] ०गणी स्त्री. जमीन मोजण्याचें साठ बिघ्यांचें एक माप . ०जन्म क्रिवि . बारा जन्मांत ; कधींहि नाहीं . ०जिभ्या बारजिभ्या - वि . अतिशय खोटें बोलणारा ; बडबड्या ; विसंगत बोलणारा . [ बारा + जीभ ] ०ज्योतिर्लिंगें नअव . शंकराचीं प्रसिद्ध १२ लिंगें तीं : - १ सोरटी सोमनाथ ( काठेवाड ). २ मल्लिकार्जुन ( मोंगलाई ). ३ महाकालेश्वर ( उज्जनी ). ४ ओंकार अमलेश्वर ( ओंकार मांघाता ). ५ परळी वैजनाथ ( मोंगलाई ). ६ भीमाशंकर ( पुणें जिल्हा ). ७ अवंढ्या नागनाथ ( मोंगलाई ). ८ काशीविश्वनाथ ( काशीस ). ९ त्र्यंबकेश्वर ( त्र्यंबक - नाशीक ). १० केदारेश्वर ( हिमालय ). ११ घृष्णेश्वर ( वेरुळ - मोंगलाई ). १२ रामेश्वर ( मद्रास इलाखा ). ०तेरा पु. भाषणांतील असंबद्धता . ( क्रि० लावणें ; सांगणें ; बोलणें ). ०द्वारी दारी - स्त्री . बारा दारें असलेला एक प्रकारचा उन्हाळ्यांत राहण्याचा हवाशीर बंगला किंवा १२ पायवाटा असलेली विहीर . ( ल . ) धंदाउद्योगांतील अव्यवस्थितपणा , पसारा . [ हिं . बारादारी ] ०पांच पु. ( कु . ) कुडाळदेशकर ब्राह्मण राजवटींतील बारा नाईक व पांच देसाई मिळून एकंदर सतरा मानकरी . ०बंदी बारबंदी डी - स्त्री . बाराबंद असलेला अंगांत घालण्याचा एक कपडा ; बारकशी . ०बलुतीं तें - नअव . बलुतेदार पहा . बळी वळी - पु . जन्मापासून बाराव्या दिवसाचा एक विधि ; बारसें . गरोदरेसि प्रसूति होये । पुत्रजन्में सुखावली ठाये । तेही बाराबळी जैं पाहे । तें भौगूं लाहे पुत्रसुख । - एभा १२ . ६०३ . ०बाबती स्त्रीअव . वरिष्ठ किंवा मुंख्य अधिकार्याचे वसुलापैकीं बारा हक्क . विवाह किंवा मोहतूर इ० कांच्या वेळचे पाटलाचे बारा हक्क ( विडा , टिळा , शेला , वाटी , गणसवाशीण इ० ). शेतकरी किंवा महार यांचे लग्न इ० बाबतींतील बारा हक्क . बारा बलुतेदारांपैकीं प्रत्येकाचे बारा हक्क . ( ल . ) लंगड्या सबबी ; पाल्हाळिक व मूर्खपणाचें भाषण ; गडबडगुंडा . ( क्रि० सांगणें ). ०बाबू बापू भाई ( बारभाई )- घरचे बारा - निरनिराळ्या उद्देशांचा व भिन्नभिन्न स्वभावांचा परंतु एका कार्याकरतां एकत्र झालेला लोकसमूह ; तसेंच या लोकांचा ( घोटाळ्यांचा ) कारभार ; अनेकांच्या हातीं असलेली सत्ता . ०बाविशा स्त्रीअव . ग्रामाधिकार्यांचे हक्क . गांवामध्यें बाराबाविशा रामजी पालटाच्या आहेत . [ बारा + बावीस ] ०बोड्याचा वि. ( कुण . ) एक शिवी ; जारज . ०भट वि. सदोदित आगंतुकी करणारा . ०भुजां भुजांबळ - न . ( गो . ) पुष्कळ शक्ति . [ बारा + भुज = हात ] ०महाल पुअव . राज्यकारभाराच्या सोयीसाठीं केलेलीं सरकारी कामांचीं निरनिराळीं १२ खातीं . हीं पुढील प्रमाणें :- पोतें , कोठी , पागा , दरजी , टंकसाळ , सौदागिरी , इमारत , हवेली , पालखी , थट्टी , चौबिना व शरीमहाल . ०महिने पुअव . वर्षाचे महिने :- चैत्र , वैशाख , ज्येष्ठ , आषाढ ( आखाड ), श्रावण , भाद्रपद ( भादवा ), आश्विन , कार्तिक , मार्गशीर्ष ( शीर ), पौष ( पूस ), माघ , व फाल्गुन ( शिमगा ). हीं नावें अनुक्रमें पुढील नक्षत्रांवरुन पडलीं आहेत :- चित्रा , विशाखा , ज्येष्ठा , आषाढा , श्रवण , भाद्रपदा , आश्विनी , कृत्तिका , मृगशीर्ष , पुष्य , मघा , फाल्गुनी दर पौर्णिमेस या या नक्षत्रीं चंद्र असतो . बारा महिन्यांची प्राचीन संस्कृत नावें :- मधु , माधव , शुक्र , शुचि , नभस , नभस्य , इष , ऊर्ज , सहस , सहस्य , तपस , तपस्य . - क्रिवि . बाराहि महिनेपर्यंत ; सगळ्या वर्षभर . बारा महिने तेरा काळ क्रिवि . सदोदित ; नेहमीं ०मावळें नअव . पुण्यापासून शिरवळपर्यंतचीं सह्याद्रीच्या पुर्व उतरणीवरील १२ खोरीं तीं :- अंदर , नाणें , पवन , घोटण , पौड , मोसें , मुठें , गुंजण , वेळवंड , भोर , शिवतर व हिरडसमावळ . - मुलांचा महाराष्ट्र २० . ०माशी वि. वर्षाच्या सगळ्या महिन्यांत येणारें किंवा असणारें ( आंबा , फणस , फूल इ० ). ०माशी - न . खरबुजाची एक जात . खरबूज - न . खरबुजाची एक जात . ०रांड्या पु. रंडीबाज मनुष्य . ०राशी स्त्रीअव . ( ज्यो . ) क्रांतिवृत्ताचे बारा विभाग . मेष , वृषभ , मिथुन , कर्क , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , धन , मकर , कुंभ व मीन . ०लग्नें नअव . ( ज्यो . ) ज्या वेळीं जी रास क्षितिजावर उदयस्थानीं असते तें त्या वेळचें लग्न . याप्रमाणें १२ लग्नें आहेत . बाराराशी पहा . वफात पु रबिउलावल महिन्यांतील बारावा दिवस . या दिवशीं महमद पैगंबराची पुण्यतिथि असल्यानें हा दिवस मुसलमान लोक सण म्हणून साजरा करतात . [ अर . वफात = मृत्यु ] ०वा पु. माणसाच्या मृत्यूच्या बाराव्या दिवशीं करावयाचा श्राद्धादि विधि . - वि . अनुक्रमानें मोजलें असतां ११ च्या पुढील . वा बृहस्पति असणें ( ल . ) वैर असणें ; उभा दावा असणें ( जन्म राशीपासून बाराव्या राशींत गुरु असल्यास तो त्या माणसास फार दु : ख देतो त्यावरुन ). ०वादी स्त्री. चपलांची , वहाणांची , एक जात , प्रकार . ०सहस्त्री पु. बाराहजार फौजेचा सरदार . आटोळे सेना - बारा सहस्त्री । - मराचिथोरा ५२ . ०सोळा स्त्रीअव . सूर्याच्या बारा व चंद्राच्या सोळा कळा . आटूनियां हेमकळा । आटणी आटल्या बारासोळा । - एरुस्व ७ . ५० . ०हक्कदार पुअव . हक्क असलेले खेड्यांतील वंशपरंपरेचे बारा हक्कदार :- देशमुख , देशपांडे , कुळकर्णी , पानसरे , शेट्या इ ०क्षरी स्त्री. बाराखडी पहा . बाराक्षरि एका सारखी । - ऋ ७६ . [ बारा + अक्षर ] बारु , रो , ला , ली , बारोला , बारोली , बारोळा वि . बारा पायल्यांचा ( मण , खडी , माप ). बारोत्तर वि . एखाद्या संख्येहून अधिक बारा . शके बाराशतें बारोत्तरें । - ज्ञा १८ . १८१० . [ बारा + उत्तर ] बारोत्रा पु . व्याजाच्या रकमेचा बारावा भाग ( या भागाची सूट देतात ). दरसालदरशेंकडा बारा या दराप्रमाणें व्याज . [ बारा + उत्तर ]
|