Dictionaries | References ब बैसका Script: Devanagari See also: बैसक , बैसकार Meaning Related Words बैसका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( काव्य )बैठक ; बसकर ; गालिचा , सतरंजी , चटई इ० बसण्याकरितां पसरलेली वस्तू ; आसन वर्हाडां बैसका पाये प्रक्षाळूनी तळीया उचलुनी । पुस्पें फळें ताबाळें वीशेष । - धवळे , उत्तरार्ध १५ .बसण्याची तर्हा , पद्धत ; बसणें . कांडीं पडती बहुत । परि बैसका न सोडी पर्वत ।सत्कार ; आदरानें बसवून घेणें ; बसविणें . भीमकें केला बैसकार । - कथा १ . ८ . १४८ . [ बैसणें ] बैसकासन - न . घोड्यावरील बैठक ; जीन . पृष्ठीं मिरवलीं बैसकासनें । [ बैसणें + आसन ] बैसणा - वि . बसणारा . विजाती देखोनि नयना । सोहंभावें भुंकेन जाणा । भजन थारोळा बैसणा । गुरुदारीं सुणा मी होईन । - एभा १२ . ५८१ . [ बैसणें ] बैसणाइत - पु . ( महानु . ) अधिपति ; राजा . तो राजूर रोहिणखेडिचा बैसणाइत । - ऋ १३५ . बैसणी - स्त्री . बैठक ; आसन . स्थावरां हि तळवटीं । बैसणी घे । - माज्ञा १६ . २६२ . बैसणें - अक्रि . ( काव्य ) बसणें . ( व्यवहारांत फक्त आज्ञार्थी एकवचनीं प्रयोग ). कांतेजचि मूर्त बैसलें । आसनावरी । - ज्ञा ६ . २५८ . - नअव . बैठक ; आसन . व्यापकाचीं बैसणें । जिये स्थानीं । - ऋ ७९ . [ सं . उपविश ] बैसतखेवो - क्रिवि . बसल्या बरोबर . आघवें अभ्यासूं सरे । बैसतखेवो । - माज्ञा ६ . १९१ . बैसीनणें - अक्रि . ( महानु ) बसणें . पाहूनेरुं सा ** नि श्री अनंतू । बैसीनिलें चित्रशाळे आंतू । - शिशु १६७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP