Dictionaries | References

भित

   
Script: Devanagari
See also:  भिंत

भित     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : भिंत

भित     

 स्त्री. 
दिवाल , भित्ति ; मातीची किंवा दगड विटा वगैरेची उभी रचना .
नेत्रांस अंधत्व आणणारा विकार . [ सं . भित्ति ] सामाशब्द - भितखंड - न . ( ना . ) भिंताड . भितखांब , भिंताडखांब - पु . भिंतींत बसविलेला खांब . भितड , डी - स्त्री . ( कु . ) वळचण ; घराच्या भिंतीच्या बाजूला काढलेली पडवी . भिंतनागोरी पाणी - स्त्री . भिंतीजवळ नागोरीनें ( चेंडूनें ) खेळणें ; दोन गड्यांनीं एक काठी व दोन चेंडू घेऊन भिंतीस लागून असलेल्या मोकळ्या जागीं खेळण्याचा एक खेळ . - मखेपु ५१ .
०फोड्या वि.  घरफोड्या . भितबड स्त्री . ( गों . ) भिंतीचा आधार .
०सरी  स्त्री. ( कु . ) भिंतीवरील लाकडाची पट्टी . भिंताड न .
घराच्या भिंतीशिवाय दुसरी कोणतीहि भिंत ; अनाच्छादित भिंत ( बाग , किल्ला , पडकें घर यांची ); लहान भिंत .
( सामा . ) भिंत ( तिरस्कारार्थी ). भिंतीवरचें लिहिणें - न . कांहीं प्रसंगीं स्त्रियांनीं भिंतीवर काढलेलीं गोपुरें , आकृति . भिंतीची चिमणी - स्त्री . भिंतीस लावण्याचा दिवा . भितोडी , भिती - स्त्री . ( गो . ) घरासभोंवारची , भिंतीला लागून असलेली जमिनीची पट्टी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP