Dictionaries | References

भीक नको पण कुत्रा आवर, आटप

   
Script: Devanagari

भीक नको पण कुत्रा आवर, आटप     

एक भिकारी एका मनुष्याकडे भीक मागावयास गेला असतां त्यानें त्या भिकार्‍यावर आपला कुत्रा सोडला. त्यावेळीं त्या भिकार्‍यास असें झालें कीं, आतां हा आपणांस चावणार. तेव्हां कोठून या घरीं भिक्षा मागण्यास आलों ? तेव्हां त्यानें मालकाची विनवणी केली कीं, बाबा भीक देऊं नको पण आपल्या कुत्र्यास आटप. यावरुन एखादी गोष्ट करावयास जावें तो अशी भयंकर आपत्ति अंगावर यावी कीं ती पहिली गोष्ट बाजूस राहून या आपत्तींतून कशी सुटका करुन घ्यावी याचीच विवंचना मागें लागावी, अशा वेळीं म्हणतात. " पण ओळख निघण्याच्या भीतीनें ‘ भीक नको पण कुत्रा आवर ’ असें धोरण अवलंबून किसननें पहिले एकदोन दिवस रफिउद्दीनकडे उघडपणें बघण्याचा प्रसंग देखील टाळला. " -काळें पाणी १४५. -पामो ६३४. -गांगा १२५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP