स्त्री. - जलस्थलमय गोल ; भूगोल .
- भूमि .
- जमीन या शब्दांखालीं दिलेल्या सर्व अर्थांत व वाक्यप्रचारांत जमिनीच्या ऐवजीं भुई शब्दहि योजतात .
- शरीराची उंची ; चण ; बांधा ; ठेवण . त्या माणसाची भुई ठेंगणी आहे . [ सं भूमि ; सिं . भुई ]
म्ह० पळत्या पायाला भुई थोडी . ( वाप्र . )
०उकरणें क्रि . भुई ओर खडणें ; निष्कारण पायाचीं बोटें भुईवर ओढीत राहणें ( दोषी , गुन्हा शाबीत झालेल्या किवा लाजलेल्या इसमासंबंधानें म्हणतात ).
भुईचा सावरणें क्रि . ( ल . ) भयंकर दुखण्यांतून बरें होणें ; पुनः आपल्या पायांवर उभें राहणें .
भुईच्या तुकड्यावर राहणें कोठें तरी राहणें .
भुईचा लहान वि . खुजट ; ठेंगू ; लहान चणीचा .
भुई फोडून जाणें क्रि . ( लज्जेनें ) भुईंत गडप होण्यास , तोंड लपविण्यास तयार होणें , असणें .
भुईंत जाणें क्रि . खुजट , खुरटें होणें ( प्राणी , वनस्पति ).
०बडविणें क्रि . ( ल ) तुफान घेणें ; खोटा ठपका , आरोप करणें . साप साप म्हणून भूई बडवूं नये .
भुई बोम देऊन उठणें एखाद्याच्या पापाविरुद्ध लोकांनीं मोठ्यानें ओरडणें ; पाप प्रसिद्ध होणें , करणें , सामाशब्द
०आवळी स्त्री. एक झाड . हिची पानें लाजाळू सारखीं बारीक ; उंची वीत दोन विती असते . फळें हिरवीं व नाचणीएवढीं ; रुचि आंबट व कडवट असते .
०कंद कांदा - पु . एक वनस्पति , कंद .
०काला पु. जमीन सारवण्यासाठीं एकत्र केलेलें शेण व पाणी ; सारवण .
कोहळा , कोहाळा , कोहोळा , ० कोव्हाळा , कोहळें , कोव्हळें पुन . भुईकोहळीचा कंद . भूईकोहळ्यांत साधा भुईकोहळा व दूधभुईकोहळा अशा
दोन जाती आहेत . याचा पाक शक्तिवर्धक आहे . - वगु ४ . ११६ .
०कोहळी, कोव्हाळी स्त्री . भुई कोहळ्याचा वेल .
०कोट पु. मैदानावरचा किल्ला . डोंगरी किल्ल्याच्या उलट .
भुईंचणे , भोयचणे पु . अव . ( तंजा . ) भुईमूग .
०घर न. भुईखालील खोली ; तळघर .
०चांपा, चांफा पु . एक फूलझाड . याला पानें फुटण्यापूर्वीं भुईंतूनच दांडा येऊन त्यास फुलें येतात .
०चार स्त्री. ( राजा ) गुरांना खावयास योग्य असें हिरवें गवत , ओला चारा इ
०छत्री स्त्री. एक वनस्पति ; अलंबें ; कुत्र्याचें मूत .
०ठाकूर पु. ( निंदार्थी ) खुजा , ठेंगू . वामन मूर्ति मनुष्य इ
००तरवड पु. एक औषधी झाड ; सोनामुखी .
०देणें न. जमिनीचें भाडें .
०नळा पु. दारुनें भरलेला मातीचा नळा . हा भुईंवर ठेवून पेटविला म्हणजे दारुच्या ठिणग्या कारंज्यासारख्या उडतात .
०नेत न. एका औषधीचें नांव .
०पारणें न. ( पानाशिवाय , ताटाशिवाय ) भुईवरच जेवण्याचें व्रत .
०पाळणा पु. भुईवरचा पाळणा . घोडेपाळण्याच्या उलट .
०फुगडी स्त्री. एक मुलींचा खेळ . - मेखेपु २१८ .
०फोड न. भुईछत्री पहा .
०बिब्बा पु. ( बे . ) एक प्रकारची वनस्पति . बिब्बा उतल्यास हिचा रस लावल्यानें तो कमी होतो .
०भाग पु. ( सरकारनें ) पैशाच्या रुपानें धारा घेण्याऐवजीं जमीनीच्या उत्पन्नाचा घेतलेला भाग .
०भाटलें न. - ( कों . )ज्यामध्यें वरकस अथवा निकृष्ट धान्यांची लागवड करतात अशी जमीन ; वरकस जमीन
; डोंगराळ आणि सखल जमीन . आगर व शेत व भुईंभाटलें व महाजनकी ह्यांचें
उत्पन्न .
- ( कांहीं खतपत्रांमध्यें जमिनी याअर्थी हा शब्द योजतात ) सर्व प्रकारच्या व सर्व उपयोगाच्या जमिनी .
०भाडें न. दुसर्याच्या मालकीच्या जमिनीवर इमारत बांधली असतां मालकीहक्काबद्दल द्यावयाचें भाडें ; भुईदेणें .
०माडा पु. ( कों . ) आपोआप बीज पडून उगवलेला रोपा .
०मीठ न. डोकेंदुखी , दंश इ० वर लावण्यास करतात तो चिकणमाती , मीठ व पाणी यांच्या मिश्रणाचा लेप .
०मूग पु. - एक कंद . याच्या वेलाचे ताणे जमिनीवर पसरतात . वेलास आर्या फुटून त्या
जमिनींत गेल्यावर तेथें त्याच्या शेंगा होतात . भुईमुगाचा खाण्याकडे व तेल
काढण्याकडे उपयोग होतो
- वेलाची शेंग .
०रिंगणें न. सामान्यतः रिंगणें ; लहान मुलाचें चोखणें .
०शेंग स्त्री. भुईमुगाची शेंग .
०सपाटी स्त्री. भूपृष्ठ
०सर न. भुई ; जमीन ( घराची ). - क्रिवि . भुईच्या पृष्ठभागावर ; भूपृष्ठाला लागून .
०सरपट, टां क्रिवि . - भुईस लागून ; भुईबरोबर ( वृक्षाची खांदी , घराचें पाखें इ० असणें );
- सरपट्या बाजूनें पण पृष्ठभागापासून दूर ( बाण , गोळी इ० कांचें जाणें ). [ भुई + सरपटणें ]
०सरपटा पु. जमीनीवर पसरणार्या एका वेलीचें नांव .
०सांड क्रिवि . ( राजा . ) भुईपासून थोडें वर ( ओझें उचलणें ); जमीनसांड .