Dictionaries | References

भुरंग्यासारकी अर्थ ना, आनी फोंतीसारकी बॉलायकी ना

   
Script: Devanagari

भुरंग्यासारकी अर्थ ना, आनी फोंतीसारकी बॉलायकी ना

   ( गो.) मुलांसारखा आनंद नाहीं आणि फोंतीसारखी बढाई, प्रतिष्ठितपणा नाहीं. फोंत पुढील प्रकाराला म्हणतात. जळती बिडी मांडीवर अथवा हव्या त्या ठिकाणीं टेकून चांगला चटका घ्यायचा व त्या भाजलेल्या जागीं शिशाची गोळी ठेऊन ती दाबून बांधायची. असें केल्यानें थोडया दिवसांत त्या जागीं एक छिद्र तयार होतें व त्यांतून शरीरातल्या दोषांचा निचरा होऊं लागतो रोज ती धुवून पुसून स्वच्छ करावी लागते, इतर शरीराचीं नित्य कार्यें एक वेळ राहिलीं तरी चालतील पण फोंतीची हयगय मुळींच चालत नाहीं. म्हणूनच तिला ‘ बढाईखोरअसें विनोदानें म्हणतात. पोत घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP