|
वि. मेलेलें ; मृत . [ सं . मृत ] ०मडें - न . अतिशय अशक्त मनुष्य ; मरतुकडा . मढ्यासारखा - वि . कृश ; अशक्त . ढें - न . अतिशय अशक्त मनुष्य ; मरतुकडा . मढ्यासारखा - वि . कृश ; अशक्त . ०वड वडा - स्त्रीपु . मरणाची सांथ . ( क्रि० येणें . ) ०वांझ ज - स्त्री . जिचीं मुलें लहानपणींच मरतात अशी स्त्री वांजपण संदिसें गेलें । तों मरतवांज नांव पडिलें । - दा ३ . ३ . ३९ . ( कर्हाडी ) मरतांना एकहि मूल जिवंत नसलेली स्त्री . ०संभाळ पु. मरावयास टेकलेलें माणूस , पशु इ० ची शुश्रूषा . प्रेमपूर्वक केलेलें संगोपन ; आस्था ; काळजी . ( क्रि० घेणें ). कोणत्याहि गोष्टीचा केलेला अतिरेक ( जेवण , झोंपणें , बसणें , लिहिणें इ० चा ); शेवटपर्यंत पिच्छा पुरविणें . ( क्रि० घेणें ). मरतडणें - अक्रि . मरावयाच्या बेतांत असणें ; मरावयास टेकणें . मरता आहार - पु . मरणोन्मुख माणसाचें शेवटचें खाणें . मरताक - न . ( कुण . ) मृताची और्ध्वदेहिक क्रिया ; दिवस . मरण ; मृत्यु . मृत मनुष्य ; प्रेत ; मुडदा . [ सं . मृतक ] मरती कळा - स्त्री . मरणाच्या वेळीं चेहर्यावर येतो तो फिकटपणा ; प्रेतकळा . आजार्यासारखा दिसणारा माणूस . मरती भावना - स्त्री . मरण जवळ येऊन ठेपलें आहे असें जीवरुन समजतें अशी मुद्रा . मरती रात्र - स्त्री . ऐन रात्रीचा समय . ( स्वतःचें म्हणणें खरें आहे हें ज्यांना साक्षी ठेवून दाखवावयाचें त्यापैकीं एक प्रमाण ). मरती रात्र झाली आहे खोटें बोलत नाहीं . काळी रात्र , भरल्या बंदाखालीं बसणें पहा . मरतुकडा , मरतुंगडा , मरतंगडा - वि . अगदीं अशक्त ; रोडका ; मरतमढें . मरमर - स्त्री . धोक्याच्या परिस्थितींत , प्राणावरच्या संकटांत अविचारानें शिरणें ; फाजील धाडसी ; साहसी वृत्ति ( वेडपा , कैदाशीण इ० ची ). ( क्रि० येणें ; लागणें ; घेणें ). उपहास ; टवाळकी . म्ह० आपली हाण ( हानि ) आणि जगाची मरमर . कुरकुर . पाठी बैसला दावेदार । जाली मरमर संसारीं । ०घेणें अत्यंत क्षीण , मरणासन्न होणें . मरणाची धास्ती घेणें ; हाय खाणें . मरमरा , मरवडा - पु . मरमर अर्थ १ पहा . ( निंदार्थी ) पराकाष्ठेचा अशक्तपणा ; मरणप्राय स्थिति . तुला काय मरवडा आला ! मरवड - स्त्री . मरण , रोग इ० ची साथ ( माणूस , जनावर इ० ची ).
|