Dictionaries | References

मांग

   
Script: Devanagari

मांग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : माँग, याचना, माँग, अनी, माँग, माँग

मांग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A low race or an individual of it. They are employed as executioners &c. अंगांत मांग शिरणें or येणें g. of o. To fly into a rage.

मांग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A race held to be low or an individual of it.

मांग     

 पु. एक हिंदु जात व तींतील व्यक्ति . फाशी देण्याचें काम यांचेकडे असे ; यांच्यांतील कांहीं सांकेतिक शब्द - हिडका = मारामारी . कुडतुल = पेटी . धादल , खडल = फोडणें . कुडपळ = गाडी . गांगल = चांभार . पेडणें = पळून जाणें . खुमर = दार . तवला = खुनासहित दरोडा . शेग = मालाचा वाटा . पेडम , भुरा = युरोपियन . हलक , हलवा = सोनें किंवा चोरीचा माल . दुबक , फुकणी = बंदूक . कूड , कुडच = घर . नादी , खवडी = घरफोडी . बे , बोय = दिवा . चिलड = कुलूप . खारपे , दमुल = पैसा . ऊन = चांदणें . झुकीर , मुलसी = पोलीस . ताड = दोरी . हुरकत , पेडा , हुराकडा = पळ . तोलकला = निजला . निलगंटी = काठी . कडूल , कटनूल = तलवार ; हत्यार . मूच , नली = चोरी . इ० - गुजा . [ सं . मातंग ] अंगांत मांग शिरणें , मांग शिरणें , येणें - रागावणें ; त्वेष चडणें .
०गारुडी   गारोडी - पु . मांगांतील एक पोटजात . हे म्हशी विकतात व भादरतात . यांच्या टोळ्या गांवाबाहेर पालांत उतरतात ; ढोल बाजवून नजरबंदीचा खेळ करतात . धान्य , मेंड्या इ० चोरतात .
०गारुड  न. मांगगारुड्याची जादुगारी ; मूठ फेकणें . मांगटा , डा पु .
( निंदार्थी ) मांग .
मांगाचा भाट व उपाध्याय . अस्पृ ४७ . मांगणी - स्त्री . मांग जातीची स्त्री . मांगणीची पत्री - स्त्री . अमावास्या , संक्रांत किंवा महापर्व आलें असतां भीक मागत फिरणार्‍या मांगणीच्या टोपलींत ( दुःखें व ग्रहबाधा नाहींशी करण्यांत हिचा उपयोग होतो म्हणून ) टाकलेलीं द्रव्यें ( धान्य , तेल , मीठ इ० ). मांगणीचें पत्तर - न . वरील भीक मागणार्‍या मांगणीचें तरसाळें , पोखरलेला भोपळा . मांग ह्र्दय , यी - वि . निष्ठुर अंतःकरणाचा ; निर्दय ; पाषाणह्रदय . [ मांग + ह्रदय ] मांगळी , मांगोळी - स्त्री .
थोरल्या दिवाळीच्या दिवशीं मांग लोक मोळाचा ओढण्याकरितां दोर करुन चावडीवर ठेवितात तो .
मुंजींत मुंज्याच्या कमरेस बांधावयाची मोळाची दोरी . आणि स्वधर्माची मांगळी । बांधे वाचेच्या पिंपळी । - ज्ञा १३ . ६५८ . [ मांग + वळी ] मांगिणी - स्त्री . एक क्षुद्र देवता . पूजा जोगिणी मांगिणी । - दावि ६३ . मांगेला - पु . गुजराथेंत मांगास म्हणतात .

मांग     

मांग हा अतिशय तापट, कडक असतो
यावरुन अतिशय रागावणें
त्वेष चढणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP