|
स्त्री. पृथ्वी ; दगडावाचून पृथ्वीचा अंश ; मृत्तिका , धूळ . ( ल . ) स्थूल शरीर . कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती । - तुगा २९८७ . ( ल . ) नाश ; नासाडी ; दुर्दशा . पोरानें संसाराची माती करुन टाकली . अगदीं काहीं नाहीं याअर्थी . तुला काय कळतें माती ? निरुपयोगी ; बिनकिमतीचा पदार्थ . ( ल . ) मृत शरीर . निसर्गानें मेलेल्या जनावराचें मांस ; मढें . शाडू ( मातीचा गणपति , चित्रें इ० कां करितां ). [ सं . मृत्तिका , मृद = कुस्करणें ; प्रा . मत्ति ( ट्टि ) आ ; हिं . मट्टी - माटी ] म्ह अति तेथें माती = कोणत्याहि गोष्टीचा अतिरेक झाल्यानें नुकसान होतें जित्या रोटी आणि मेल्या माती . दरीची माती दरींत आटते . ( वाप्र . ) ०आडकरणें घालणें ठेवणें टाकणें - ( शब्दशः व ल . ) मातीखालीं ठेवणें ; पुरणें ; आच्छादणें ; झाकणें ( प्रेत , धन , ठेवा ). विसरुन जाणें ; पुनःपुनः त्याच गोष्टीचा उल्लेख न करणें . ०मातेरा मातेरा करणें - ( एखाद्या वस्तूची ) नासाडी करणें ; तिचा सुखावहपणा हिरावून घेणें . ०मोत मोत करणें - ( व . ) प्रेत दहन करणें , मूठमाती देणें ; पुरणें . अन्नात ०अन्नात - एखाद्याच्या उपजीविकेचें साधन नाहीसें करणें ; पोटावर पाय आणणें . कालवणें - एखाद्याच्या उपजीविकेचें साधन नाहीसें करणें ; पोटावर पाय आणणें . ०खाणें पराभव पावणें . ०च्या विकणें , देणें - हलक्या दरानें , कमी किंमतीनें विकणें . पैशाची फार जरुरी होती , म्हणून मला आपलें सामान मातीच्या मोलानें विकावें लागलें . मोलानें विकणें , देणें - हलक्या दरानें , कमी किंमतीनें विकणें . पैशाची फार जरुरी होती , म्हणून मला आपलें सामान मातीच्या मोलानें विकावें लागलें . ०जड - मरणोन्मुख मनुष्याचें शरीर जड होणें . होणें - मरणोन्मुख मनुष्याचें शरीर जड होणें . ०टाकणें घालणें लोटणें - बुझविणें ; ( कलह , अपराध इ० कांवर ) पांघरुण घालणें ; विसरण्याचा प्रयत्न करणें . ह्या वादावर आतां माती लोटली पाहिजे . मातीला देणें जाणें येणें - ( कर . ) प्रेत पुरणें ; मढें पुरणें ; प्रेतयात्रेला जाणें . मातीला गेलों होतों - काल माती दिली - मातीला चला . तोंडांत ०तोंडांत - प्राप्ती बुडणें . मातींत , मातींत मिसळणें - प्रेत पुरणें ; और्ध्वदेहिक , उत्तरक्रिया करणें . पडणें - प्राप्ती बुडणें . मातींत , मातींत मिसळणें - प्रेत पुरणें ; और्ध्वदेहिक , उत्तरक्रिया करणें . ०होणें नाश होणें . जें अनया कारण , त्याची पळांत हो माती । - मोआदि ३३ ६० . खराबी होणें . यालागी श्रवणाची होय माती । परमार्थप्राप्ति त्यां कैची । - भाराबाल ११ . १३० . बेकार होणें . सामाशब्द -( माती शब्द समासांत पूर्वपदीं आला असतां त्याचें मात असें रुप होतें ) ०कट वि. माती असलेला ( पदार्थ ) ०कण न. माती मिसळल्यामुळें नासलेलें धान्य . [ माती + कण ] मात्कर पु . ( व . ) मातीच्या भिंती घालणारा ; मातकाम करणारा . मातकरी पु . ( राजा . ) शेतजमीन भाजण्यासाठीं पसरलेल्या राबावर माती घालण्याकरितां लावलेला मजूर ; परैगडी . [ माती + करी ] ०कापड न. ( अग्निपुटें देण्याकरितां कुपीस्थ रसायनें इ० ची ) ज्यांत भट्टी लावावयाची त्या भांड्यास मातीचा लेप दिलेल्या कापडाच्या पट्टीनें लेपटणें . असला लपेटा ; आवरण . [ माती + कापड ] ०काम न. मातीचें काम ; मडकीं घडणें , विटा घालणें , चित्रें करणें चिखलानें भिंत रचणें इ० काम . ०खण खाण - स्त्री . मातीची खाण . भाजावळीकरितां दाढीवर पसरण्यासाठीं दाढीच्या नजीकच्या जमीनींतील जी माती खणतात ती जागा . ०गाळणें न. चाळणीवजा चिकणमाती गाळण्याचें मडकें मातट , ड , ळ , मातमळ वि . माती मिसळल्यामुळें खराब झालेला ( गूळ , धान्य इ० पदार्थ ); मातीमिश्रित . ०सामान न. मातीचीं चित्रें , भांडीं इ० जिनसा . मातियेडें न . मातकाम करणारा . - शर . [ प्रा . ] मातिरा पु . मातेरें ; नाश . चरमतनू परमलाभ , न करि मातिरा । - भज ५७ . मातीचा मैराळ वि . जंगी व स्थूल ; गलेलठ्ठ ( मनुष्य ). मातीचें अत्तर न . उत्तम मातीपासून तयार केलेलें अत्तर . मातीचे कुल्ले पुअव . खरें प्रेम नसतां प्रेमाचा आणलेला नुसता आविर्भाव ; दृड बंधन , एकोपा नसल्यामुळें संकटाच्या वेळीं उपयोगी न पडणारें नातेवाईक , संबंधीं ; बळें लावलेलें नातें किंवा संबंध ; उसनें प्रेम , अवसान . म्ह० मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत . मातीचें तेल न . खडकतेल ; घासलेट . मातीमीठ न . खारट मातीपासून तयार केलेलें मीठ . माती वडार पु . वडारांतील एक पोट जात .
|