Dictionaries | References

मारणें

   
Script: Devanagari
See also:  चपेटा मारणें , टाच देणें

मारणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Said to a driveling boaster.
   To strike; to act or bear upon with a quick or strong effect. Ex. ह्या तळ्याची ओल त्याच्या ओटीवर मारती; काय हो उन्हाच्या अह्या or झळ्या मारतात; काय शस्त्रांची झळक or चकाकी मारती; आगीची आंच -धग -वाफ -मारती; वारा मारतो; ताप मारतो. 2 To strike, shoot, dart;--as a stitch or rheumatic pain, a चमक- धमक -लचक -शिलक -शूल -कळ -उसण; also शीर- डोई -डोसकें -मस्तक मारतें. छाया मारणें g. of s. To have a cast of the likeness of. Ex. तुमच्या बोलण्यांत तीर्थरूपाच्या बोलण्याची छाया मारती. झोप मारती or डुकळ्या मारतात in. con. To be drowsy or nodding. वास -घाण -मजा &c. -मारणें g. of s. To have a tincture, hue, savor, smack, smatch of--i. e. a cast or stroke of.

मारणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Kill. Beat. Drive in, fix. Master, subdue.
 v i   Strike. To do with force or promptitude; as बंदुक मारणें, लढाई मारणें.

मारणें

   घोड्यास चालण्याबद्दल इशारा देणें ; टांचेला मंब्रेज त्यानें घोड्यास टोंचणें .
 स.क्रि.  १ ठार करणें ; जीव घेणें . व्युत्पत्तिदृष्ट्या , मृ ह्या धातूस अनुसरुन जरी हा अर्थ प्राथमिक आहे तथापि तो मारणें ह्या क्रियापदाच्या ऊन प्रत्ययान्त रुपाशीं टाकणें हे क्रियापद योजलें असतां , अथवा मारणें क्रियापद कांहीं विशिष्ट क्रियाविशेषणांशी किंवा क्रियाविशेषण असलेल्या जीव ह्या शब्दाशीं योजिलें असतां मात्र होतो . उदा० मारुन टाकणें ; ठार मारणें ; अगदीं मारणें ; निःशेष मारणें = जिवानशीं - जिवानें - जिवें - मारणें . २ ताडन करणें ; ठोकणें ; पिटणें ; हाणणें ( कोणत्याहि साधनानें ). ३ जिंकणें ; पराभव करणें . ४ ( पारा , वंग इ० कांच्या ) तीव्रतेचा नाश करणें . ५ हल्ला करणें ( घर , गांव , प्रवाशी इ० कांवर ). ६ लुबाडणें ; अंगावर तुटून पडून ( ठार मारुन , ठोकून , जुलूम करुन ) हिरावणें ; हिसकावून घेणें . सोनें - खजाना - हुंडी - मारली . ७ काबीज करणें ; वश करणें ; दमन करणें ( मनोविकार , इच्छा , वासना ). ८ ठोकणें ( खिळे , खुंट्या , मेखा ). ९ लावणें ; बसविणें ; न हालेसा करणें ( कुलपें , वांसे , बिड्या , कोणतीहि वस्तु इ० जलद घट्ट बसणें असा अर्थ असतां योजतात ). १० ( सोनारी धंदा ) कोणत्याहि . जिनसाला पैलू पाडणें किंवा विशिष्ट आकार देणें , ठसा उठबणें वगैरे उदा० वटंगावर बिलवर मारणें . ११ संभाळणें ; निभावणें ; निभावून नेणें ; पांर पाडणें . ही एवढी आणीबाणीची वेळ मारुन न्या म्हणजे झालें . १२ लिहिणें . पत्रकावर शेरा मारला पाहिजे . १३ करणें ह्या क्रियापदाच्या विस्तृत अर्थी ( जोर , जलदी , झटपट , चटपट इ० क्रिया दाखविणें असतां ) उपयोग करितात . उदा० एवढें काम मारतों आणि येतों . करणें याच्या अनेक अर्थी योजलेल्या मारणें क्रियापदाचे कांहीं अर्थ :- उडविणें ( बंदूक ); लढणें ( लढाई ); लगावणें ( तरवार , चाबूक , छडी ); फेकणें ; झुगारणें ( अस्त्र ); घालणें ( घाला ); आरंभणें ( धांव , नृत्य , ताण , जोर , दम , यत्न ); ठोकणें ( तंबू ); फकदिशीं आंत टाकणें , फेकणें ( तोंडांत - मिष्टान्न , घांस , बकाणा ); गट्ट करणें , खाणें ( पैसा , माल ); चलाखीनें व हुशारीनें मिळविणें , कमावणें ( धंद्यांतील नफा ); उदा० त्या व्यापारांत म्यां दोनशें रुपये मारले ; कर्कशपणें व मोठ्यानें उच्चारणें ( आरड , हाक , आरोळी , कुकारा ); झपाट्यानें , उत्सुकतेनें करणें ( मौज , कौतुक , ख्याल , बाष्कळ गोष्टी ); - चल लौकर हात मार , फडशा करुन टाक . याप्रमाणें जोरानें , झटकन केलेलें कृत्य दाखविण्याकरितां योजलेल्या मारणें क्रियापदाचीं उदाहरणें असंख्य आहेत . यावरुन जोर , दम , चलाखी , उचल ह्या अर्थांच्या द्योतक अशा घालणें , टाकणें , लावणें , पाडणे , हाणणें , ठोकणें इ० अर्थाच्या क्रियापदांच्या वर्गांतीलच मारणें हें क्रियापद असल्याचें दिसून येतें . १४ - अक्रि . लागणें ; परिणाम होणें . ह्या तळ्याची ओल त्याच्या ओटीवर मारती . काय शस्त्रांची झळक , चकाकी मारती
   शरीरांत एकदम उत्पन्न होणें उठणें . ( चमक , धमक , लचक , शूल , कळ , उसण इ० ); शीर - डोई - डोसकें - मस्तक - मारतें . [ सं . मृ = मरणें ; फ्रेंजि . मर ; पोर्तु . जि . मारार ] म्ह०
   मारशील ( जाळशील ) तर पुढें जाशील = जर तूं मला मारशील तर तूं पुढें जाशील ( तुला पुढें काय होईल तें समजेल ). मारण्याचा धाक घालणारास ताकीद देतांना ह्मणतात .
   मारावा हत्ती लुटावा भंडार . ( वाप्र . ) छटा , छाया मारणें - सारखेपणाची लकेर असणें . तुमच्या बोलण्यांत तीर्थरुपांच्या बोलण्याची छाया मारती . झोप मारणें , डुकल्या मारणें - निद्राग्रस्त होणें ; पेंगणें . वास , घाण मारणें - ( एखाद्या वस्तूचा ) वास , रंग , रुचि , छटा , लकेर , झांक असणें . मजा मारणें - चैन करणें ; मौज करणें .

मारणें

   रटटा देणें. ‘ बळें मारुती मारतहि चपेटा। ’ -राक १.५.

Related Words

मारणें   बाता मारणें   पिछाडया मारणें   वेंग मारणें   वेंगाटी मारणें   बहर मारणें   सकार मारणें   दांडी मारणें   जत्‍या मारणें   लहर मारणें   लहरा मारणें   पायपोस मारणें   वठठया मारणें   दुमणी मारणें   दडंची मारणें   रेघ मारणें   पैण मारणें   हात मारणें   छटा मारणें   छाया मारणें   भरारी मारणें   मांजर मारणें   मन मारणें   बगलेंत मारणें   बढाई मारणें   लात मारणें   लाथ मारणें   बांगडी मारणें   डोई मारणें   काखेस मारणें   शालजोडींतला मारणें   (एखाद्या खाद्यावर) ताव मारणें   खुंट्याच्या जोरानें उड्या मारणें   जिवावर उड्‌या मारणें   जेनाच्या पदरीं गांठ मारणें   दुसर्‍याच्या अंडानें विंचू मारणें   शालजोडींतून मारणें देणें   शेंडीला गांठ मारणें   भाताचें खाणें काय, बायकोचें मारणें काय   आलखटपलखट मारणें   खश मारणें   खाकेस मारणें   खाकोटीस मारणें   खुंटी मारणें   खूण मारणें   कांटा मारणें   कांठावर मारणें   उपकारांनी मारणें   उड्या मारणें   ऊत मारणें   खरका मारणें   अंकुश मारणें   अखेरी मारणें   अघाडी मारणें   गोळा मारणें   घर मारणें   घाण मारणें   घोडे मारणें   चक्‍कर मारणें   वाट मारणें   वाण मारणें   वान मारणें   वास मारणें   सरी मारणें   शिंप मारणें   आग मारणें   गांड मारणें   गांव मारणें   गिर्‍हाईक मारणें   गुटका मारणें   जीव मारणें   जोडे मारणें   झक मारणें   दुरेघी मारणें   छड्डू मारणें   छान मारणें   दंडची मारणें   दगड मारणें   दणका मारणें   दम मारणें   चपेटा मारणें   तरवार मारणें   तलवार मारणें   तळ मारणें   ताव मारणें   झोंप मारणें   टांक मारणें   टांग मारणें   टेक मारणें   डुलक्या मारणें   डूब मारणें   डोंब मारणें   डोळा मारणें   डोळे मारणें   डोळ्यांनी मारणें   बाजू मारणें   बाला मारणें   बाल्या मारणें   बाळ्या मारणें   बाह्या मारणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP