Dictionaries | References

मुरणें

   
Script: Devanagari

मुरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 10 To be swallowed up and lost; to be consumed largely and unproductively--men, money, materials, in a business or work. मुरी मारणें To abscond or hide one's self for a season. मुरून बसणें To sit compressedly and closely; to cower or crouch with limbs and head gathered in.

मुरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Soak or sink into; be saturated. Mellow; to ripen and dry. To become sober, serious. To become conversant with.
मुरी मारणें   To abscond.
मुरुन बसणें   Sit compressedly and closely.

मुरणें     

अ.क्रि.  
अ.क्रि.  दोघांचा वगैरे अंश असणें ; कांही व्यंग , कमीपणा असणें सामान्यत ; पाणी सुरणें असा प्रयोग .
( पाणी , दूध , तेल , तूप , रंग इ० ) पातळ पदार्थ , वस्त्र , भाकरी , लांकूड , जमीन इ० मध्यें शिरुन त्यांत निविष्ट होऊन राहणें ; त्यांत जिरणें .
शोषून घेतला जाणें ; पाकांत घातलेल्या आंब्यांत , लोणच्याच्या फोडींत पाक किंवा क्षार भरला जाणें ; किंवा जिरुन सर्व भागांत पसरुन असणें ; पाकणें .
दुधाला चांगल्या तर्‍हेनें विरजण लागणें .
पिकणें ; पूर्णत्वास येणें ; पक्व होणें ; ( बी ) पूर्ण तयार होऊन वाळणें . बीज दोन रोज ठेविलें म्हणजे मुरेल , मग पेरायास चांगलें .
परिपक्वदशेस येणें ; मूळचा खडबडीतपणा , कच्चेपणा इ० जाऊन गुळगुळीतपणा येऊन ( वस्तु ) वापरण्यासारखी किंवा उपयोगी होणें ; वस्तु नवीन असतां तिचा कोरेपणा वापरल्यानें जाऊन ती सरावाची होणें .
गंभीर , स्थिरमनस्क , शांत होणें ; नियतवृत्ति होणें ; विचारी होणें ; निवळणें .
अभ्यासानें , संवयीनें तरबेज होणें ; वाकबगार होणें ; मुरब्बी होणें ; पूर्ण परिचित असणें . हा मनुष्य ह्या कामांत मुरला आहे , ह्यासच हें काम सांगावें .
( राग , इच्छा , वासना इ० ) दबणें ; कमी होणें ; नाहींसा होणें ; दडणें .
घाम आल्याशिवाय ताप कमी होणें ; बारीक ताप अंगांत राहणें .
( गळू , फोड , उठाणू इ० ) फुटल्याशिवाय बसणें ; आंतल्याआंत दबून जाणें ; जिरणें .
( चिंतनांत ) मग्न होणें ; गढून जाणें .
एखाद्या कामीं अजमासापेक्षां जास्त ( मनुष्यें पैसा , पदार्थ ) लागणें ; अधिक खप होणें .
( ल . ) तृप्त होणें . [ सं . मूर्व ] मुरुन बसणें - हातपाय आंखडून आणि गुडघ्यांत डोकें घालून बसणें ; मुरमुशी मारुन बसणें मुरी मारणें - कांहीं कालपर्यंत स्वतः लपून राहणें ; दडणें ; दडी मारुन बसणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP