Dictionaries | References

मेखळा

   
Script: Devanagari
See also:  मेखला

मेखळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A woman's girdle. A sort of cloak.

मेखळा     

 स्त्री. 
उपनयन संस्कारांत त्रैवर्णिकानीं कमरेला बांधावयाचें तिहेरी कटिसूत्र , दोरी . हें कटिसूत्र वर्णपरत्वें निरनिराळ्या प्रकारचें असतें . तेचि मेखळा मिरवती । - ज्ञा १ . ९ .
स्त्रियांचा कमरपट्टा ; कटिबंध ; सांध्यावर ; फांशावर सिंहाचें मुख वगैरे चित्र असलेला कमरपट्टा . नितंब अतिदीर्घ हा नचि पुरे यया मेखला । - कमं १ . ५४ . जेवि कां मेखळेचा सिंह विराजमान । - स्वादि ११ . १ . ४५ . [ सं . ]
तरवारीच्या मुठीस बांधलेली दोरी ; सांखळी .
कमरेस गुंडाळावयाचें वस्त्रविशेष . समर्थें कंथा मेखळा देऊन स्छळासी आणिलें । - सप्र २१ . ५५ .
०बंधन  न. मेखला बांधण्याचा विधि ; उपनयनविधि . [ सं . मेखला + बंधन ]
०मुख वि.  नेवराच्या ( तंगडीच्या ) पुढच्या भागाच्या उजव्या बाजूस वळलेला भोवरा असलेला ( घोडा ). हें अशुभ चिन्ह आहे . - मसाप २ . ५६ . अशुभचिन्हें पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP