Dictionaries | References

म्हण

   
Script: Devanagari

म्हण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : ओपार

म्हण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A popular saying; a saw, adage, proverb. 2 A way of speaking. Ex. एका म्यानांत दोन सुऱ्या अशी म्हण आहे. 3 A report or rumor.

म्हण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A popular saying; a proverb. A rumour.

म्हण     

ना.  बोधपर वाक्य , लोकोक्ती , वचन . सुभाषित , सूक्त .

म्हण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते ते वाक्य   Ex. नाचता येईना अंगण वाकडे अशी एक म्हण आहे.
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लोकोक्ती
Wordnet:
asmজনশ্রুতি
bdबाथ्रा फाव
benপ্রবাদ
gujકહેવત
hinकहावत
kanಗಾದೆ
kasکَہاوَت
kokओपार
malപഴഞ്ചൊല്ല്
mniꯄꯥꯎꯔꯧ
oriଲୋକୋକ୍ତି
panਕਹਾਵਤ
sanलोकोक्तिः
tamபழமொழி
telసామెత
urdکہاوت , مثل

म्हण     

उअ . म्हणून कांतेला श्रमहो झणी म्हण तरु पुष्पें स्वहस्तें हरी । - अकक २ , विठ्ठल , रसमंजरी १ . [ म्हणणें ; सं . भण = बोलणें ]
 स्त्री. 
०गत   स्त्री न . म्हणणें ; बोलणें ; भाषण . आम्हीं तुमची ह्मणियागतें । जें सांगतसा तें मानूनि हितें । काया वाचा मनसा तुमतें । अनन्य भावें शरण जी । - स्वादि १२ . ४ . ७९ . म्हणजे उअ .
लोकपरंपरेनें आलेलें नीतिबोधक किंवा दृष्टांताद्युपयोगी लोकमान्य झालेलें सुटसुटित आणि चटकदार असें दृष्टांतभूत वाक्य ; रुढवचन ; म्हणणी ; लोकोक्ति . कोणाचें वाईट करुं नये अशी वडिलांची म्हण .
त्याचा अर्थ कीं ; अन्यशब्दांनीं तेंच सांगावयाचें तर ; किंवा ; अथवा . अश्व म्हणजे घोडा .
बोलण्याची रीत ; वाक प्रचार . एका म्यानांत दोन सुर्‍या अशी म्हण आहे .
त्याच्या योगानें ; तेणें करुन ; त्याचा परिणाम अस होतो कीं ; अशी स्थिति असल्यामुळें ; पूर्वोत्तर क्रियांचा कार्यकारणभाव असतां कारण क्रियावाचकापुढें या अव्ययाचा योग होतो . पाऊस पडला म्हणजे पीक चांगलें होईल ; तुम्हीं बोलला म्हणजे माझें कार्य होईल . [ म्हणणें ; म . म्हणिजे = म्हटलें जातें ] म्हणणें - क्रि .
बातमी ; खबर ; वार्ता . [ म्हणणें ]
बोलणें ; उच्चारणें ; वदणें .
पठण करणें ; पाठ म्हणणें . म्हणेल तो चुकेल .
वाचणें ; अभ्यास करणें ; पढणें ; सर्व म्हणून टाकणें ; मुखोद्गत करणें ( वेद , शास्त्र इ० )
नांव घेणें ; नांव उच्चारणें ; आव्हान करणें ; बोलणें ; नामोच्चार करणें . [ सं . भण ] म्हणणी - स्त्री .
म्हणणें ; पाठ म्हणणें .
म्हणण्याची किंवा पठण करण्याची रीत अथवा मार्ग ; म्हणण्याची तर्‍हा ; धाटणी .
एक किंवा एकदां म्हणावयाचा पाठ ( वेद वगैरेचा ).
म्हण ; आहणा ; लोकोक्ति . म्हण पहा . दुसर्‍याचें जो वाईट इच्छितो त्याचें बरें होत नाहीं अशी लोकांची म्हणणी आहे . म्हणण्यासारखा - क्रिवि . विशेष ; सांगण्यासारखा ; उल्लेख करण्याजोगा . तो लांब टांग्या असून शर्यतीत म्हणण्यासारखा उल्लेख करण्याजोगा पुढें आला नाहीं . - वि . फार चांगला . विशेष . हरदासाची कथा कांहीं म्हणण्यासारखी नसते . म्हणतखेवो , खेवीं - क्रिवि . म्हणता क्षणींच ; म्हटल्या बरोबर . कर्‍हा म्हणतखेवो - पंच १ . ३९ . म्हणता - वि . म्हणणारा . - एभा ७ . ४४३ . म्हणतां म्हणतां - क्रिवि . फार थोड्या अवधींत ; बोलताबोलतां ; अगदीं अल्प काळांत ; वारा अनुकूल असल्यामुळें म्हणतां म्हणतां आमची होडी एक मैल गेली . म्हणपणें - क्रि . म्हटले जाणें . [ प्रा . ] म्हणविणें , म्हणिविणें - क्रि .
एखाद्यास बोलावयास किंवा म्हणावयास लावणें ; बोलविणें ; वदविणें ; उच्चारविणें ; पठण करविणें किंवा करावयास लावणें अथवा भाग पाडणें .
संज्ञा देण्यास , अभिधान करावयास लावण्यास , नामोच्चारण करावयास लावणें , भाग पाडणें ; म्हणवून घेणें ; शिवाजीनें आपणास इ . स . १६७४ मध्यें राजा म्हणविलें .
कांहीं गुणांची प्रौढी मिरवणें . तूं आपणास धीट म्हणवितोस मग साप पाहतांच कां पळून गेलास ? [ म० म्हणणें चें प्रयोजक ] म्हणासार - क्रिवि . ( गो . ) म्हणेपर्यंत . म्हणितली , लें - क्रि . म्हटली - लें ; बोलली - लें . कर्ता भोक्ता म्हणितलीं . - विपु ३ . ८४ . ते वेळीं म्हणितलें रुक्मिणीसीं । - उषा ६४ . ३० . म्हणविणें पहा . म्हणिया - वि . आज्ञाधारक . म्हणिये तुम्हाते मागतील महाऋषि । - ज्ञा ३ . ९९ . म्हणियागत - वि . आज्ञाधारक ; चाकर ; आज्ञेप्रमाणें वागणारा . - ज्ञा ९ . २८४ . म्हणियारा , रें - वि .
म्हटलेलें करणारा . होतील सकळ । ऋद्धिसिद्धि म्हणियारीं . - तुगा ३२४ .
 पु. दास ; चाकर ; दूत . नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा . - तुगा ३६० . अवचितें काळाचें म्हणियारे । मारीत सुटती एकसरें . - दा ३ . ९ . ३९ . म्हणियें - न .
आज्ञा ; सेवकांचें कर्तव्य ; सांगितलेलें काम . आणी कांवो तूं दिससीं दुश्चिती । म्हणिये काम नलगे तुझ्या चित्तीं । - तुगा १११ .
काम . - माज्ञा १३ . ४३९ . [ प्रा . ] म्हणिपणें - म्हटला जाणें . - एभा ६ . १८५ . म्हणीजेलें - म्हटलें . द्विजी निषधापासाव म्हणी जेलें । - र ४ . म्हणुं - म्हणावा ; म्हणतो जणूं काय . चारु तापद वन्हिच हा म्हणुं तरी . - मृ ७ . म्हणे - मानतो . द्वीगुण काळी तुसचपेटी म्हणे वज्रमुस . - वैद्यकबाड ७९ . [ सं . मन्ये ; भण ] म्हणेरा - तगादा . - शर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP